Earbuds hearing loss: आपल्यापैकी अनेकजण रस्त्याने चालताना, काम करत असताना किंवा अनेकदा झोपतानाही हेडफोन आणि इयरफोन वापरताना दिसतात . कधीतरी दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणूनही हेडफोन वापरला जातो . बाहेरच्या जगाचा पूर्ण आवाज थांबवण्याची क्षमता असलेला वायरलेस हेडफोन आपल्या कानांचे किती नुकसान करू शकतो याची कल्पनाही आपल्याला नसते . मार्केटमध्ये नवनवीन प्रकारचे ब्लूटूथ इयरफोन आणि वायरलेस हेडफोन (Wireless Headphones) उपलब्ध असताना लहान मुलांपासून ते कॉलेजवयीन तरुणांसह वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकांकडे वायरलेस हेडफोन आहेत . यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी ही सवय तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम करणारी आहे . चला जाणून घेऊया वायरलेस हेडफोन सतत कानावर असले तर त्याचा धोका किती ?
वायरलेस हेडफोनचा कितपत धोका ?
वायरलेस हेडफोनचा सतत वापर करत असाल तर नक्कीच तुम्हाला धोका आहे .बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, हेडफोन मुळे सुमारे एक दशलक्ष म्हणजेच दहा लाख किशोरवयीन मुले आणि प्रौढांची ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा धोका वाढला आहे .या संशोधनात असे आढळून आले की बारा ते 34 वर्षे वयोगटातील 24 टक्के लोक ' अनसेफ लेवल ' वर गाणी ऐकतात .
या आजाराचा गंभीर धोका
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्यानुसार, जगभरात सर्व वयोगटातील जवळपास 43 कोटी लोकांना ऐकण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत . WHO नुसार, जर तुम्ही आठ तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ 85 डेसिबल पेक्षा अधिक आवाज ऐकत असाल तर तुमची ऐकण्याची क्षमता हळूहळू संपू शकते . अतिउच्च आवाजात काही ऐकत असाल तर . Noise induced Hearing Loss (NIHL ) या आजाराचा गंभीर धोका जाणवू शकतो .
ऐकण्याची क्षमता संपण्यासह दुसऱ्याही अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात . यामध्ये ear canelमध्ये घाम आणि बॅक्टेरिया जमा होऊ लागतो .आणि हेच इन्फेक्शन वाढत जाते . NIH आणि FDA मध्ये झालेल्या अनेक संशोधनांमध्ये झालेल्या अभ्यासात, हेडफोन्समुळे निघालेलं रेडिएशन खूप कमी आहे .आणि ते तितकेसे धोकादायक नाही . यामुळे कर्करोगाचा आणि कोणत्याही प्रकारचा मोठा धोका उद्भवत नाही . यावर सध्या संशोधन सुरू आहे .पण जर हेडफोन्सचा सतत वापर केला तर कानात शिट्टी किंवा रिंग सारखा आवाज येण्याची समस्या येऊ शकते .
हेडफोनचा योग्य वापर कसा कराल ?
Who च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तुम्ही 60 टक्क्यांपेक्षा जास्त आवाज ऐकू नयेत .किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त ऐकू नयेत .आवाज कट करणारे हेडफोन वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला आवाज वाढवण्याच्या आवश्यकता भासणार नाही .