beer : जगभरातील लोक बियर (beer) पिण्यास पसंती देतात. विशेषत: तरुणांमध्ये बियर पिण्याचे शौक जास्त असतात. दारू जितकी जुनी तितकी त्याची किंमत वाढते. पण बिअरच्या बाबतीत असे होत नाही. जर बियर खूप जुनी किंवा एक्सपायर झाली असेल तर ती पिऊ नये. एक्स्पायरी डेट निघून गेलेली बियर प्यायल्यास काय होईल हे जाणून घेऊयात. कालबाह्य झालेल्या बियरमुळे आपले किती नुकसान होते ते जाणून घेऊयात...


बियरची एक्स्पायरी डेट झालेली असेल तर कधीही विकत घेऊ नये (beer can expire?)


प्रत्येक बियरची एक्सपायरी डेट वेगळी असते. साधारणपणे बहुतेक बिअर 6 महिन्यांत संपते. त्यामुळे बियर खरेदी करताना तिची बनवण्यात आलेली तारीख म्हणजे एक्सपायरी डेट तपासणे आवश्यक असते. मात्र, जर बियरची एक्स्पायरी डेट झालेली असेल तर कधीही विकत घेऊ नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही खराब झालेली बियर प्यायली असेल तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते. याशिवाय, तुम्ही गंभीर आजारी देखील होऊ शकता.


आता प्रश्न असा आहे की दारू जुनी झाली की त्याची किंमत आणखी वाढते. पण बिअरच्या बाबतीत असे होत नाही. बियर जुनी झाली की खराब का होते. खरे तर दारू खराब होत नाही कारण ती बनवण्याची पद्धत वेगळी आहे. याशिवाय, त्यात अल्कोहोलचे प्रमाण देखील खूप जास्त आहे, जे ते खराब होऊ देत नाही. तर बिअरमध्ये फक्त 6 ते 8 टक्के अल्कोहोल असते. तर धान्याचा वापर बियर तयार करण्यासाठी केला जातो. यामुळेच काही काळानंतर बियर खराब होते.


एक्स्पायरी डेट झालेली बियर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का? (Beer can taste bad after it's expired)


इतकेच नाही तर अनेक वेळा बियरची एक्सपायरी डेट जवळ आली असताना विक्रेते सवलत असल्याचे सांगून तुम्हाला बियर स्वस्त दरात विकतात. पण आता पासून तुम्ही जेव्हाही बियर खरेदी कराल तेव्हा तुम्ही त्याच्या कॅन किंवा बाटल्यांवर एक्सपायरी डेट जरूर वाचा. जर बिअरची मुदत संपली असेल, तर तुम्ही याची माहिती विक्रेत्याला द्यावी आणि तक्रार करावी. याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारही करू शकता. कारण कालबाह्य झालेली बिअर कोणत्याही माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. कालबाह्य झालेली बिअर प्यायल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळेच कालबाह्य झालेली बियर अत्यंत घातक असून त्यामुळे तिचे सेवन करू नये, आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.


(Disclaimer : मद्य, अल्कोहोल प्राशन करणे हे आरोग्यास हानिकारक आहे. ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्यसेवनाला पाठिंबा अथवा त्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.)


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange : मी राजगादीला मानतो हे उदयराजेंना माहितीये, बार्शी मराठ्यांचं घर घोंगडी बैठक होणार, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा तो सोपल बरा : मनोज जरांगे