Aloe Vera For Weight Loss : कोरफड (Aloe Vera) ही एक औषधी वनस्पती असून याचा वापर त्वचा (Skin Care) आणि केसांच्या (Hair) सौंदर्यासाठी (Beaty Tips) वर्षानुवर्षे केला जातो. कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही तर अनेक आजारांवर (Medical Benefits og Aloe Vera) रामबाण उपाय आहे. कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, कोलीन, मॅग्नेशियम, जस्त, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोरफडचा वापर लठ्ठपणा कमी करण्यासाठीही केला जातो, याबाबत अनेकांना माहिती नसेल. वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या. 


कोरफड वजन कमी करण्यात मदत करते. कोरफडेमुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते, यामुळे तुमचे वजन लवकर कमी होऊ लागते. कोरफडीमुळे शरीर डिटॉक्स करते. कोरफड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून वजन कमी करण्यास मदत करते. तुम्हीही याचा वापर करून वजन कमी करु शकता. कोरफडीची पाने तोडून त्याच्या आतील गर मिक्सरमध्ये वाटून घ्या. यामुळे त्याची जेलप्रमाणे पेस्ट होईल. तुम्ही पेस्टचा वापर करु शकता.


लिंबाचा रस आणि कोरफड (Lemon Juice and Aloe Vera)
लिंबूसोबत कोरफडीच सेवन केल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कोरफडीचा रस मिसळा. हे मिश्रण सकाळी एकत्र प्या. हे एक उत्तम पेय आहे, जे एकत्र घेतल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात.


कोरफडीचा गर (Aloe Vera Gel)
तुम्ही कोरफडीची ताजी पानं तोडून त्यातील गर वापरू शकता. हा कोरफडीचा गर रोज सकाळी रिकाम्या पोटी खा. असं केल्यानं तुमचं वजन झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात होईल.


जेवणापूर्वी कोरफडीचा प्या (Aloe Vera Juice)
जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्यायल्यानं तुमचं वजन झपाट्यानं कमी होऊ लागतं. यासाठी जेवणाच्या 20 मिनिटं आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्यानं पचनक्रिया सुधारते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात साठलेली चरबी जलद कमी होण्यास मदत होते. कोरफडमध्ये व्हिटॅमिन बी असते हे चरबी विरघळवून त्याचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम करते. दोन आठवडे याचा वापर केल्यावर तुम्हांला नक्की फरक दिसून येईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator