Health Tips : मिरचीचा (Chilli) वापर जेवणात खूप होतो. तुम्ही तयार केलेल्या कोणत्याही पदार्थाला मिरची घातल्याशिवाय चव येत नाही. मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन नावाचे संयुग अन्नाला तिखट आणि मसालेदार बनवते. त्यामुळे मिरचीशिवाय अन्न चविष्ट वाटते. भाज्या असोत, डाळी असोत किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ असो, प्रत्येक डिश स्वादिष्ट बनवण्यासाठी मिरचीचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणात वापरण्यात येणाऱ्या हिरव्या आणि लाल मिरच्या या दोन्हींपैकी कोणती मिरची जास्त फायदेशीर आहे? याविषयी अधकि माहिती जाणून घेऊयात. 


जाणून घ्या हिरवी मिरची का फायदेशीर आहे?


संशोधनानुसार मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. पण मिरचीचे नियमित सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनचे प्रमाण लाल मिरचीपेक्षा कमी असते, ज्यामुळे ती पचनसंस्थेसाठी अधिक उपयुक्त ठरते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह सारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीचे सेवन अधिक सुरक्षित मानले जाते. 


हिरवी मिरची वजन कमी करते


हिरव्या मिरचीचे सेवन पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. फायबर आतड्यांसंबंधी हालचाल वाढवते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. तसेच हिरव्या मिरचीमध्ये असलेले एन्झाइम अन्न पचण्यास मदत करतात. याशिवाय हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे पोटात जळजळ आणि संसर्ग टाळतात. त्यामुळे हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते.


रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते


हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हिरवी मिरचीचे नियमित सेवन केल्याने इंसुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. याव्यतिरिक्त, हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे एक संयुग असते जे स्वादुपिंडला इन्सुलिन तयार करण्यास प्रोत्साहित करते. हे इंसुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी