Health Tips : री लॅक्टेशन (Re Lactation) म्हणजे काही काळानंतर पुन्हा स्तनपानास (Breastfeeding) सुरूवात करणे. री लॅक्टेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आरोग्याशी संबंधित परिस्थितीमुळे, आजारपणामुळे किंवा बाळाला स्तनपान देण्यास नकार दिलेल्या महिलांनी पुन्हा स्तनपानास सुरुवात करणे. आता कोणत्या मातेला रि लॅक्टेशनच सामना करावा लागतो? याचा योग्य मार्ग कोणता आहे? या संदर्भात अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
री लॅक्टेशन कोण करू शकते?
या संदर्भात बोलताना स्तनपान विशेष तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे येथील डॉ. गजाला खान म्हणतात की, ज्या मातेला अचानक दूध येण्यात अडचणी येतात किंवा स्तनपानासंबंधी समस्यांना तोंड द्यावे लागते, बाळाला स्तनपान न करता येणे आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ दूध पूर्णपणे बंद झाले आहे, अशा कोणत्याही मातेला पुन्हा स्तनपानास सुरुवात करता येऊ शकते. काही आरोग्याविषयक समस्यांमुळे स्तनपानात काही दिवसांचे अंतर पडले आणि त्यानंतर ती माता बाळाला पुन्हा स्तनपान सुरु करण्यास तयार असते तेव्हा त्याला री लॅक्टेट करण्याची योग्य वेळ असे म्हणतात
री लॅक्टेशनचा योग्य मार्ग कोणता?
यामध्ये आईला/मातेला स्तनपानासंबंधी प्रशिक्षण देणे, स्तनांची मालिश करणे आणि पंपिंग करणे तसेच, बाळाला स्तनपानाकडे पुन्हा प्रवृत्त करणे या प्रक्रियेचा समावेश होतो. स्तनपान हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचे आहे.
कोणते घटक प्रभावी ठरतात?
री लॅक्टेशनच्या प्रक्रियेत तुमच्या बाळाचे वय यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लहान बाळांना री लॅक्टेट करणे सोपे होते. साधारणतः 4-5 महिन्यांच्या बाळांमध्ये दुधाचं सेवन करण्याचा दर जास्त असतो. स्तनपान आणि पंपिंग करणे हे री लॅक्टेशनसाठी मुख्य घटक ठरतात. तुमच्या बाळाची स्तनपानाची आवड देखील प्रक्रियेवर प्रभाव टाकते.
कुटुंब, मित्र आणि तज्ज्ञांकडून प्रेत्साहन मिळाल्यास हा प्रवास सोपा होतो.अशाप्रकारे तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान पुन्हा सुरु करु शकता
स्तनपान केव्हा करावे?
• बाळ उठल्यानंतर रात्री झोपताना स्तनपान करा.
• दुधाची बॉटल आणि पॅसिफायरचा वापर कमी करा. बाळाला त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्तनपान करण्यास प्रोत्साहित करा.
• स्तनपान करण्यापूर्वी स्तनाग्रांना थोडेसे आईचे दूध लावा. या टिप्सचे पालन करुन तुम्ही नक्कीच बाळाला पुन्हा स्तनपान करू शकता. तज्ज्ञांच्या मदतीने री लॅक्टेशन बाबतच्या तुमच्या सर्व शंकांचे निरसन करणे ही काळाची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या :