Health Tips : आपल्यापैकी अनेकांना मिठाई खायला खूप आवडते. चॉकलेट असो वा कुठलेही गोड पदार्थ नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. मात्र, ते जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. अशा वेळी स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेकदा मिठाईपासून दूर राहतात. खरंतर, लोकांचा असा विश्वास आहे की, साखर फक्त गोड चवीच्या पदार्थांमध्येच आढळते. पण, हे पूर्णपणे सत्य नाही. शर्करायुक्त पेये, मिठाई आणि कँडी याशिवाय असे अनेक पदार्थ आहेत ज्यात साखरेचा वापर केला जातो.  


जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना वाटतं की फक्त मिठाईमध्ये साखर असते. तर, या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यात साखरेचा वापर केला जातो. 


ब्रेड


आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात ब्रेडने करतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे ब्रेड सहज उपलब्ध होतात. साधारणपणे लोकांना व्हाईट ब्रेड खायला आवडतात. अनेकजण हेल्दी ऑप्शन म्हणून ब्राऊन ब्रेडचा वापर करतात. पण, या दोन्ही ब्रेडमध्ये साखरेचं प्रमाण असते. ब्रेडची चव सुधारण्यासाठी साखरेबरोबर किंचित मिठाचाही वापर केला जातो. 


एडेडे शुगर पदार्थ


जेव्हा साखरेचा विचार केला जातो तेव्हा चरबी मुक्त आणि कमी चरबीयुक्त उत्पादने यादीत शीर्षस्थानी असतात. या पदार्थांची चव वाढवण्याची गरज आहे आणि त्यांच्या तयारी दरम्यान उत्पादनांमधून फॅट काढून टाकणे आवश्यक आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी, चरबीमुक्त आणि कमी चरबीयुक्त उत्पादनांमध्ये साखर जोडली जाते.


केचप आणि इतर डिप्स


केचप, सॅलड ड्रेसिंग आणि बार्बेक्यू सॉस सारखे डिप्स आपण नाश्यात भजीबरोबर, सॅंडविचबरोबर खातो. या डिप्समध्ये चव आणि संतुलन राखण्यासाठी साखर मिसळली जाते.


दही


दुग्धजन्य पदार्थांमध्ये आधीपासूनच लैक्टोजपासून नैसर्गिक साखर असते. असे असूनही अनेक दही ब्रँड चव सुधारण्यासाठी साखर घालतात. 


पिझ्झा


तरूणांमध्ये जंक फूडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पिझ्झा खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. हे खाल्ल्याने आरोग्याला अनेक हानी होत असली तरी पिझ्झाच्या प्रत्येक स्लाईसमध्ये अनेक ग्रॅम साखर असते.


पीनट बटर


आजकाल बहुतेक लोकांना ब्रेड सोबत पीनट बटर खायला आवडते. पण, चांगली चव लागण्यासाठी पीनट बटरमध्ये अनेक ग्रॅम साखर जोडली जाते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी