Health Tips : टेस्टीही आणि हेल्दीही! लहान मुलांनाही खायला आवडतील असे बाजारातील चिप्ससारखेच घरच्या घरी बनवा चिप्स
Health Tips : बाजारात मिळणाऱ्या चिप्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात, ज्यामुळे आरोग्यावर या चिप्सचा परिणाम होतो.
Health Tips : खरंतर, चिप्स खायला कोणाला आवडत नाहीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच चिप्स खायला आवडतात. लहान मुलांनाही आपल्या मोकळ्या वेळेत स्नॅक्स खायला आवडतात. मात्र, बाजारात मिळणारे चिप्स आणि स्नॅक्स अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक असतात. मुलांबद्दल बोलायचे झाले तर जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे ते अनेकदा पॅकबंद चिप्सची मागणी करतात.
बाजारात मिळणाऱ्या चिप्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात, ज्यामुळे आरोग्याला मोठे नुकसान होते. जर तुम्हीही तुमच्या मुलांच्या चिप्स आणि स्नॅक्स खाण्याच्या सवयीमुळे हैराण असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी ऑप्शन्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांची इच्छा निरोगी पद्धतीने पूर्ण करू शकता. हे घरगुती आरोग्यदायी चिप्स कोणते याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ट्रेंडिंग
वांग्याचे चिप्स
बाजारात मिळणाऱ्या चिप्सपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही वांग्याचे चिप्स वापरून पाहू शकता. लहान मुलांचा सहसा वांगी खायला आवडत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही या सोप्या आणि चविष्ट पद्धतीने वांग्याला त्यांच्या आहाराचा भाग बनवू शकता. तुम्ही घरी हेल्दी वांग्याचे चिप्स बनवू शकता, जे चवीला कुरकुरीत तसेच आरोग्यदायी असतात.
वांग्याचे चिप्स बनवण्याची पद्धत
सर्वात आधी, वांग्याचे पातळ काप करा आणि ते बेकिंग ट्रे वर पसरवा. आता या वांग्याच्या कापांवर थोडे ऑलिव्ह ऑईल टाका आणि चवीनुसार मीठ, मिरपूड आणि लाल तिखट घाला. आता ते हलके तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत काही मिनिटे बेक करा. तुमचे हेल्दी वांग्याचे चिप्स तयार आहेत.
रताळ्याचे चिप्स
रताळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच, रताळ्याचे चिप्स हलक्या, कमी कॅलरी आणि कमी फॅट आहेत. तुम्ही नाश्त्यासाठी रताळे चिप्स बनवू शकता.
रताळ्याचे चिप्स बनवण्याची पद्धत
यासाठी सर्वात आधी रताळ्याचे अगदी पातळ काप करून घ्या. आता त्यावर मीठ, काळी मिरी, ऑलिव्ह ऑईल, पेपरिका पावडर आणि ओरिगॅनो घालून मिक्स करा. आता त्यांना एअर फ्रायरमध्ये 10-15 मिनिटे फ्राय करा. तुमचे रताळ्याचे चिप्स तयार आहेत.
मूग डाळीचे चिप्स
आपल्या गुणधर्मांमुळे, मूगाची डाळ आरोग्यासाठी अनेक फायदे देते. ही डाळ पचायला खूप सोपी आहे आणि आरोग्यासाठीही चांगली आहे. तुम्ही तुमच्या आहारात चिप्सच्या स्वरूपात मूगाच्या डाळीचा देखील समावेश करू शकता.
मूग डाळीचे चिप्स बनवण्याची पद्धत
सर्वात आधी, मूग डाळ किमान दोन तास पाण्यात भिजवून ठेवा आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
आता एका भांड्यात रवा आणि गव्हाच्या पिठाबरोबर मसूरचे पीठ घ्या आणि सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. त्यानंतर, त्यावर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि तिखट घालून मिक्स करा. हे मिश्रण पिठासारखे मळून त्याचे छोटे गोळे करा. आणि त्यांना फ्राय करा. तुमचे चिप्स तयार आहेत.