Health Tips : निरोगी शरीरासाठी योग्य जीवनसत्त्व आणि खनिजयुक्त (Vitamins) पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. यामुळे निरोगी शरीरामुळेच अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करता येतं. आपल्या शरीरातील पोटदेखील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण, जर तुमचं पोट स्वच्छ आणि निरोगी असेल तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. अनेक आजार हे पोटापासूनच सुरु होतात. पोटाच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 3 खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी 3 निकोटीनिक ऍसिड म्हणून देखील ओळखले जाते.
हे जीवनसत्व चयापचय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. व्हिटॅमिन बी 3 अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. हे पोट आणि पाचक प्रणाली दोन्हीसाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 3 असलेल्या पदार्थांचाही समावेश करावा.
किती प्रमाणात व्हिटॅमिन बी 3 गरजेचं?
आरोग्य तज्ञ म्हणतात की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना दररोज 16 मिलीग्राम व्हिटॅमिन बी 3 आणि महिलांना 14 मिलीग्राम व्हिटॅमिन बी 3 ची आवश्यकता असते. तर गर्भवती महिलांसाठी त्याचे प्रमाण 18 मिग्रॅ असणं गरजेचं आहे.
व्हिटॅमिन बी 3 ची लक्षणे
- वारंवार डोकेदुखी होणे
- त्वचा लाल आणि संवेदनशील होते
- थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
- नैराश्य, चिंता आणि चिडचिड होणे
कोणाला जास्त धोका आहे?
ज्या लोकांचा आहार चांगला नाही किंवा ज्यांना आहारातून पूर्ण पोषतत्व मिळतात. ज्या लोकांना पूर्ण पोषक तत्वे मिळत नाहीत अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन B3 ची कमतरता दिसून येते. त्याच वेळी, जे लोक जास्त मद्यपान करतात किंवा ज्यांना कार्सिनॉइड सिंड्रोमचा त्रास आहे त्यांना सर्वात जास्त धोका असतो.
'अशा' प्रकारे अंतर भरा
पोल्ट्री, मासे, दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य आणि शेंगा यासह नियासिन समृध्द अन्न खाल्ल्याने व्हिटॅमिन बी 3 ची पातळी भरून काढतात येते. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्हिटॅमिन बी3 सप्लिमेंट्स घेत असाल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्ही जर अशा प्रकारे जर तुम्ही शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषण घटकांचा वापर केला तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास कधीच होणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :