Health Tips : लोक सहसा सकाळी नाश्ता (Breakfast) काय करायचा याबाबत गोंधळात असतात. अनेकजण ऑफिसला जाण्याच्या धावपळीत सकाळचा नाश्ता करत नाहीत. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, डोकेदुखी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशा वेळी जर हेल्दी आणि झटपट तयार होणारा नाश्ता मिळाला तर अनेक समस्या दूर होतील. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही झटपट तयार होणाऱ्या पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत. ज्या तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हलक्या भूकेसाठी खाल्लेल्या स्नॅक्समुळे कोलेस्ट्रॉल वाढते, ज्याचा आपल्या हृदयावरही वाईट परिणाम होतो. अशा वेळी चवीबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची भूक भागवण्यासाठी तुम्ही काही आरोग्यदायी पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.
मोड आलेल्या कडधान्यांचा चाट
मोड आलेल्या कडधान्यांचा चाट हा आरोग्यदायी आणि चवदार नाश्ता मानला जातो. हा नाश्ता बनवायलाही खूप सोपा आहे. यासाठी उकडलेले कडधान्य एका बाऊलमध्ये घेऊन त्यात कच्च्या भाज्या मिक्स करून खा.
भेळपुरी
भेळपुरी हा एक हलकाफुलका नाश्ता आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. त्याची चवही खूप छान लागते. फुगलेल्या भाताचा वापर करून तयार केलेली भेळ पुरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
चना चाट
जर तुम्हाला भूक कमी वाटत असेल तर तुम्ही हरभरा उकडूनही खाऊ शकता. जर तुम्हाला काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्ही चना चाट देखील खाऊ शकता. हा प्रथिने युक्त नाश्ता आहे. तसेच, तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापासून थांबते. तुम्ही हा नाश्ता कधीही करून खाऊ शकता.
मूग डाळ चिल्ला
जर तुम्ही हेल्दी नाश्ता शोधत असाल तर मूग डाळ चिल्ला हा एक उत्तम पर्याय आहे. मूग डाळीचा चिल्ला बनवण्यासाठी तुम्हाला मूग डाळ भिजवून त्याची बारीक पेस्ट तयार करावी लागेल. या चिल्लामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हा हेल्दी नाश्ता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही खाऊ शकता. सकाळच्या वेळी हा हेल्दी नाश्ता केल्याने पोटही भरलेले राहते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.