Health Tips : केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच नाही तर हात-पायांच्या सौंदर्याचीही काळजी घेणं देखील गरजेचं आहे. ज्या लोकांची नखं (Nails) लांब असतात त्यांना अनेकदा त्यांची नखं तुटण्याची भीती असते. जेव्हा नखे ​​तुटतात तेव्हा ते वाकलेले दिसतात. त्यामुळे ती फारच वाईट दिसतात. नखं तुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. नखे तुटण्यापासून वाचविण्यासाठी किंवा त्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर केला जाऊ शकतो. नखे तुटण्यापासून वाचविण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय काही ब्युटी टिप्स किंवा घरगुती उपायांचा वापर करून त्यांना निरोगी आणि चमकदार बनवता येते. हे उपाय नेमके कोणते आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


पोषक तत्वांची काळजी घ्या


शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास नखांनाही त्याचा परिणाम भोगावा लागतो. नखांच्या वाढीमध्ये कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय व्हिटॅमिन सी देखील त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमच्या आहारात दूध, अंडी किंवा इतर आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा. व्हिटॅमिन सी साठी, हिरव्या भाज्या आणि आंबट पदार्थ आपल्या दिनचर्याचा एक भाग बनवा.


क्युटिकल्स टाळा


नखांजवळील त्वचा वारंवार खराब होत असेल तर नखेही कमकुवत होऊ लागतात. क्युटिकल्स खराब झाल्यास देखील वेदना होतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी नखांवर खोबरेल तेल लावण्याची सवय लावा.


खोबरेल तेल आणि मीठ


खोबरेल तेलात मीठ मिसळून नखांवर लावा. या तेलात काही मिनिटे नखे बुडवून ठेवण्याची सवय लावा. हे नियमितपणे रात्रीच्या वेळी करा आणि काही दिवसांतच तुम्हाला नखांची चांगली वाढ जाणवेल.


कृत्रिम नखे वापरू नका


अनेकदा अनेकजण तुटलेली किंवा वाकडी नखे लपविण्यासाठी कृत्रिम नखांचा वापर केला जातो. त्यांच्या वापरामुळे नखे अधिक कमकुवत होऊ शकतात. असे मानले जाते की, या गोष्टींमध्ये रसायने असतात, ज्याचा जास्त वापर केल्याने नखांचे आरोग्य बिघडू शकते.


ही गोष्ट लक्षात ठेवा


लांब नखं तुटण्यापासून थांबविण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या नखांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर