Health Tips : दिवसभराच्या धावपळीनंतर थकवा आल्याने बर्‍याच वेळा आपल्याला स्वयंपाक करावासा वाटत नाही. म्हणूनच अनेकजण ताजे अन्न बनवण्याऐवजी उरलेले अन्न खाण्यास प्राधान्य देतात. बहुतेक लोकांना हे माहित आहे की शिळे अन्न आपल्या शरीरावर वाईट परिणाम करते. परंतु, तरीही कंटाळा आल्याने अनेकजण शिळं अन्न खातात.


काही अभ्यासानुसार, काही खाद्यपदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम केल्यानंतर खाल्ले जातात. ते गरम केल्यानंतर खायला छान लागतात, पण यातील अनेक हानिकारक संयुगे बाहेर पडतात, जे आरोग्यावर वाईट परिणाम करण्याचे काम करतात. येथे आम्ही अशा पाच खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे शिळे अन्न खाल्ल्याने तुम्हाला आजार होऊ शकतात. 


'हे' अन्नपदार्थ शिळे खाणे टाळा


1. अंडी


अंडी शिजवण्यासाठी वापरली जाणारी उष्णता बहुतेक वेळा जीवाणू मारण्यात अपयशी ठरते. हेच कारण आहे की, जर तुम्ही याचे शिळ्या स्वरूपात सेवन केले तर ते तुमच्या शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.


2. बीट


बीटमध्ये नायट्रिक ऑक्साईड मुबलक प्रमाणात असते. शिळ्या स्वरूपात बीट सॅलडमध्ये वापरणं आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. बीटपासून बनवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने ते नायट्रेटमध्ये आणि नंतर नायट्रोसामाइनमध्ये बदलते. त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.


3. पालक


पालकामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे पुन्हा गरम केल्यावर कॅर्सिनोजेनिक नायट्रोसामाइन्समध्ये रूपांतरित होतात आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. 


4. चिकन


अंड्यांप्रमाणेच कच्च्या चिकनमध्येही साल्मोनेला असते. म्हणूनच ते पुन्हा गरम करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.


थंड तेल


ऑलिव्ह, जवस तेल आणि कॅनोला तेल यांसारख्या थंड दाबलेल्या तेलांमध्ये ओमेगा -3 फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा हे तेल पुन्हा गरम केली जातात, तेव्हा त्यांचा वापर सुरक्षित नाही.


यासाठीच तुम्हाला कितीही कंटाळा आला तरी वरील पदार्थ सारखे गरम करू नका किंवा शिळे खाऊ नका. कारण यामुळे तुमच्या शरीराला नुकसान पोहोचू शकते. ताजं अन्न खाणं आरोग्यासाठी कधीही फायदेशीर आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल