Fitness Tips : लोक निरोगी राहण्यासाठी अनेक उपाय करतात. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्दी डाएटपासून ते वर्कआउटपर्यंत लोक अनेक गोष्टींचा वापर करतात. मात्र, रोजच्या धावपळीनंतर आणि दिवसभर व्यस्त असल्याने व्यायामासाठी वेळ मिळणं कठीण झालं आहे. अशा वेळी, बहुतेक लोकांना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालायला (Walking) आवडतं. खरंतर, चालणं हा एक चांगला आणि सोपा व्यायाम प्रकार आहे.
यासाठी जिमला जाण्याची किंवा जड वजन उचलण्याची गरज नाही. मात्र, अगदी साधे व्यायाम करूनही लोक चालताना अनेकदा काही चुका करतात, ज्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा वेळी चालताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या पोश्चरकडे लक्ष द्या
जर तुम्हाला चालण्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर नेहमी तुमच्या पोश्चरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे केल्याने श्वासोच्छवासाची गती सुधारते, पाठीचा ताण कमी होतो आणि मेंजूचं संतुलन राहतं.
हात स्विंग करा
चालताना हात फिरवणे हा चालण्याचा एक चांगला मार्ग आहे. चालताना हात फिरवल्याने तुमची चालण्याची क्षमता सुधारते. तसेच तुमचा तोल आणि लय राखण्यास मदत होते. तसेच, बरेच लोक चालताना हात न फिरवता संथ गतीने चालतात. त्यामुळे तुम्हाला चालण्याचा योग्य फायदा मिळत नाही.
चुकीच्या चपला वापरू नका
चुकीच्या चपलांमुळे सुद्धा तुम्हाला चालताना अडथळा येऊ शकतो. अशा वेळी चालताना कोणते बूट घालावेत, तुमच्या पायांना कोणत्या चप्पल कंम्फर्टेबल होतील याचा नीट विचार करा. यामुळे चालताना तुम्हाला कोणतीही दुखापत होणार नाही.
पाण्याची कमतरता
चालण्यासारखे व्यायाम करत असतानाही हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही डिहायड्रेटेड झाल्यास, तुम्हाला थकवा येऊ शकतो. अशा वेळी चालताना नेहमी पाण्याची बाटली तुमच्या बरोबर ठेवा आणि वारंवार पाणी पित राहा.
चालताना खाली पाहा
चालताना अनेकदा लोकांना खाली पाहत मोबाईल वापरण्याची सवय असते. मात्र, या सवयीचा तुमच्यावरही नकारात्मक परिणाम होतो. असे केल्याने तुमच्या मानेवर आणि पाठीवर दबाव येऊ शकतो. अशा वेळी चालताना मोबाईल वापरणं टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :