Stock Market Opening: आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस... आज शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड उसळी पाहायला मिळाली. ओपनिंग सेशन दरम्यान सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोघांमध्ये उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 66,800 पार व्यवहार करत होता. सेन्सेक्स 208.82 अंकानी म्हणजेच, 0.31 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर, निफ्टी 70.05 अंकांनी म्हणजेच, 70.05 अंक टक्क्यांच्या वाढीसह 19,890 वर व्यवहार करत होता. याव्यतिरिक्त बँक निफ्टीमध्ये 0.32 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि ते 45,300.15 व्यवहार करत होता. 


सेन्सेक्सच्या 27 शेअर्समध्ये उसळी


सेन्सेक्समधील टॉप 30 पैकी 27 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. एचसीएल स्टॉकमध्ये सर्वाधिक 1.26 टक्के वाढ झाली आहे आणि तो प्रति शेअर 1277.95 रुपयांवर व्यवहार करत होता. तसेच एसबीआय, मारुती, टीसीएस, विप्रो, एशियन पेंट, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, एटी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, शेअर्स. जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिन्स, आयटीसी, पॉवर ग्रिड, टायटन, आयसीआयसीआय बँक, भारतीय एअरटेल आणि टाटा स्टीलचे उत्पादनही वाढले आहे.


'या' शेअर्सची पडझड 


सेन्सेक्सच्या 30 पैकी केवळ तीन शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये सर्वाधिक पडझड बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा शेअर 0.05 टक्क्यांनी घसरुन 7405.70 रुपये प्रति शेअरनं व्यवहार करत आहे. तसेच, एनटीपीसी आणि इंडसइंड बँकेच्या स्टॉकमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


काही सेक्टर्समध्ये घसरण


शेअर बाजारातील सर्व क्षेत्रांतही वाढ सुरू आहे. सर्वात मोठी उसळी पीएसयू बँक सेक्टरमध्ये 1.86 टक्के आहे, जी 4,793.85 वर व्यापार करत आहे. खाजगी बँका, तेल आणि वायू, फार्मा, मीडिया, वित्तीय सेवा, आरोग्य यांसारखी क्षेत्रे सतत वाढत आहेत. केवळ कंज्युमर सेक्टर 0.10 टक्क्यांनी घसरलं आहे.


रेल्वेसह अदानींच्या शेअरमध्ये वाढ


भारतीय रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. RVNL 8.14 टक्क्यांनी वधारला असून प्रति शेअर 176.10 रुपयांवर व्यवहार करत आहे. IRCON 13.77 टक्क्यांनी वधारत प्रति शेअर 152 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच, IRFC 9.99 टक्क्यांनी वाढला असून प्रति शेअर 84.80 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 1.35 टक्के आणि अदानी पोर्टमध्ये 3.21 टक्के वाढ दिसून येत आहे.