Dryfruits : ड्रायफ्रूट्स म्हणजेच सुका मेवा खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि जवळपास सर्व प्रकारच्या पोषणाची आवश्यकता पूर्ण होते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर आहे. बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, ड्रायफ्रूट्स हे फायबर, फॅट आणि प्रोटीनचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. यासोबतच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजेही मुबलक प्रमाणात आढळतात. खराब कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरची समस्या दूर करण्यासाठी ड्रायफ्रूट्स खूप उपयुक्त ठरतात. काही लोक ड्रायफूट्स भाजून खातात तर काही कच्चे खातात. चला जाणून घेऊया ड्रायफ्रूट्स खाणे कसे चांगले.
 
भाजलेले की कच्चे कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स फायदेशीर आहेत?


एका हेल्थ वेबसाइटनुसार, ड्राय फ्रूट्स कच्चे खा किंवा भाजून, दोन्ही प्रकारे फायदेशीर असतात. कोरड्या भाजलेल्या, कच्च्या किंवा तेलाने फिल्टर केलेल्या ड्राय फ्रूट्समध्ये प्रथिने, कॅलरीज, फॅट, कार्ब्सची कमतरता नसते.
 
ड्रायफ्रूट्स भाजताना काळजी घ्या


तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. उदाहरणार्थ, पूर्वीच्या तुलनेत पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि अँटिऑक्सिडंट्स कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भाजताना तापमान आणि भाजण्याची वेळ याकडे लक्ष दिल्यास हे टाळता येऊ शकते.
 
ड्रायफ्रूट्स जास्त गरम करू नका


जर ड्रायफ्रूट्स बराच वेळ गरम करून 120 अंश सेल्सिअस तापमानात ठेवलं त्यात घातक रसायने तयार होतात. यामुळे शरीराला इजा होऊ शकते. उदाहरणार्थ, जर बदाम 25 मिनिटे गरम केले तर त्यात ऍक्रिलॅमिनेट रसायन तयार होऊ शकते, जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे.
 
ड्रायफ्रूट्स कच्चे खाणं योग्य आहे का?


खरंतर ड्रायफ्रूट्स कच्चे खाणं शरीरासाठी हानिकारक नाही. पण जर तुम्ही ड्रायफ्रूट्स योग्य जागी, चांगल्या बरणीत ठेवले तर ते व्यवस्थित राहतील. पण जर ते व्यवस्थित ठेवले गेले नाही तर त्यात बुरशी किंवा जीवाणू सहज वाढू शकतात आणि ते खाल्ल्याने रोगाचा प्रसार होऊ शकतो. अनेकजण ड्रायफ्रूट्स कच्चेच खातात. मात्र, हे प्रमाण देखील नियंत्रणात असायला हवं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल