Raw Milk : आपल्या दैनंदिन आहारात (Food) दूध (Milk) हे फार महत्त्वाचं आहे. कारण दुधात आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी असतात. दूध हा आरोग्याचा खजिना आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन आढळतात. याशिवाय त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात ज्यात जीवनसत्त्वे ए, डी, के आणि ई असतात.
पण, तुम्हीही तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील जे कच्चे दूध (Raw Milk) पितात. त्यांना पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, दूध न उकळता घेतले जाऊ शकते का? कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे की नाही हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर आम्ही या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत.
आरोग्यासाठी हानिकारक
जर तुम्ही कच्च्या दुधाचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण कच्च्या दुधात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यात लिस्टेरिया आणि साल्मोनेला सारख्या हानिकारक जीवाणूंच्या उपस्थितीमुळे, तुम्हाला ताप, पोटदुखी, डोकेदुखी, थकवा आणि उलट्या होऊ शकतात. कच्चं दूध तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
कच्चे दूध धोकादायक का आहे?
तसेच, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, कच्च्या दुधात अनेक प्रकारचे पोषक आणि एन्झाईम्स आढळतात, जे उकळल्यावर नष्ट होतात. त्यामुळे कच्चे दूध प्यावे पण ही समजूत चुकीची आहे. दूध नेहमी उकळल्यानंतर त्या दुधाचे सेवन करा. दुग्धजन्य पदार्थ असो किंवा गाईचे दूध हे सर्व नीट उकळून प्यावे. कारण दूध उकळून प्यायल्यास जास्त तापमानामुळे त्यातील हानिकारक बॅक्टेरियाही नष्ट होतात आणि तुम्हाला सर्व प्रकारची पोषकतत्त्वेही मिळतात. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही दूध प्याल तेव्हा ते उकळून घ्या जेणेकरुन ते तुमच्या आरोग्याला कोणताही त्रास होणार नाही. कच्च्या दुधाचं सेवन टाळलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.