Health Tips : गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते. या दरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी, महिलांना निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रसूतीनंतरही (Pregnent) महिलांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण आईचे दूध बाळाच्या विकासासाठी खूप फायदेशीर असते. स्तनपान करणाऱ्या महिलांना अनेक आजारांचा धोका असतो. अशा परिस्थितीत तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करून तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवू शकता. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
अक्रोडाचे लाडू
स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी अक्रोड खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडच्या लाडूचा समावेश करू शकता. हे लाडू अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. याशिवाय मेथी दाणे, बडीशेप, डिंक इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. याचा वापर करून तुम्ही लाडू बनवू शकता.
खिचडी
खिचडीला आरोग्याचा खजिना म्हटले जाते. त्यात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. जर तुम्ही पहिल्यांदाच आई होत असाल तर खिचडीला तुमच्या आहाराचा एक भाग नक्की बनवा. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही जिरे आणि हिंग किंवा इतर मसाले वापरू शकता. खिचडीमुळे पचनसंस्था निरोगी राहते.
बडीशेपची चहा
स्तनदा महिलांसाठी बडीशेपचा चहा खूप फायदेशीर आहे. नवीन आईच्या आहारात हा चहा असणे खूप महत्वाचे आहे. बडीशेपचा चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात या बिया टाका आणि हे मिश्रण चांगले उकळा, नंतर गाळून घ्या, कोमट झाल्यावर हा चहा प्या.
ड्रायफ्रूट्स
नवीन आईसाठी ड्रायफ्रुट्स खाणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये लोह, व्हिटॅमिन डी, फोलेट यांसारखे पोषक घटक आढळतात. जे स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी आवश्यक आहेत. सकाळी ब्रेकफास्ट तुम्ही ड्राय फ्रूट्सचा समावेश करू शकता.
पदार्थांमध्ये आल्याचा समावेश करा
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. नवीन आईसाठी आलं खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही डाळी, सूप किंवा भाज्यांमध्ये आल्याचा समावेश करू शकता. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :