Health Tips : काही लोकांचे पाय सतत दुखत असतात. जास्त चालण्यानं पाय दुखतात असं अनेकांचे मतं असते. काही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण पाय दुखण्याची काही वेगळी कारण असू शकतात. त्यामुळे तुमचे पाय सतत दुखत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. सतत पाय दुखीची पुढील कारणे असू शकतात-


शरीरात लोहाचे प्रमाण कमी असणे 
पौष्टिक पदार्थ न खाल्ल्यानं किंवा सतत जंक फूड खाल्ल्यानं शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते. लोहाचे प्रमाण कमी असणे हे देखील पाय दुखीचे कारण आहे. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला लेग्स सिंड्रोमचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढेल आणि पाय दुखी देखील कमी होईल. 


डाएटमध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश न करणे
सध्या लोक त्यांच्या डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करत नाहियेत. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि मिनरल यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या घटकांचे प्रमाण कमी झाल्यानं पाय दुखीची समस्या जाणवते. 


व्हिटॅमिन  बी-12 ची कमतरता
शरीरात व्हिटॅमिन बी-12 जर कमी असेल तर थकवा जाणावतो. व्हिटॅमिन बी-12 शरीरात रेड ब्लड सेल्सच्या कार्यामध्ये सुधारणा करते. त्यामुळे दूध, अंडे आणि मासे हे पदार्थ खाल्ल्यानं शरीरातील व्हिटॅमिन बी 12 वाढते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha