Migraine : मायग्रेन (Migraine) ही अशी एक समस्या आहे ज्याचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होतो. हा त्रास सौम्य डोकेदुखीपासून सुरू होतो. हळूहळू यामुळे होणाऱ्या वेदना या असह्य असतात. सहसा हा त्रास डोक्याच्या काही भागात उद्भवतो पण हळूहळू तो संपूर्ण डोक्यात पसरू लागतो. यामुळे, मळमळ, उलट्या, असह्य वेदना यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.


हिवाळ्यात मायग्रेन का वाढू शकतो?


मेयो क्लिनिकच्या मते, हवामानातील बदल, जसे की अति थंडी किंवा उष्णता, कोरडी हवा, उच्च आर्द्रता, हवेच्या दाबातील बदल इत्यादींमुळे मायग्रेन होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात मायग्रेनची समस्या आणखी वाढू शकते. यासाठी थंडीच्या दिवसांत मायग्रेन ट्रिगर होतो. 


मायग्रेनची लक्षणं काय असू शकतात?



  • जास्त कॉफी किंवा अल्कोहोलचे सेवन केल्याने मायग्रेन ट्रिगर होतो

  • भावनिक ताण घेतल्याने

  • खूप मोठा आवाज आल्याने

  • झोपण्याच्या पद्धतीत बदल झाला तर त्रास होतो

  • हार्मोनलमधील बदल 

  • योग्य वेळी जेवण न केल्याने

  • जास्त मीठाचं सेवन

  • औषधांचा अभाव

  • हवामानातील बदल


या कारणांमुळे तुम्हाला मायग्रेनची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असल्यास, हे ट्रिगर करणारे घटक लक्षात ठेवा. मायग्रेनवर कोणताही उपचार नसला तरी औषधं घेतल्याने आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने यावर नियंत्रण मिळवू शकता. 


मायग्रेनचा त्रास कसा कमी होईल?


मायग्रेनचा त्रास सुरू होण्यापूर्वी आपल्या त्याची काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणे दिसू लागताच, सावध व्हा. स्वतःला दूर करा आणि शांत ठिकाणी राहा. शक्य असल्यास आवाजापासून दूर जाऊन शांत राहण्याचा प्रयत्न करा. 



  • आपल्या आहाराची काळजी घ्या. आपल्या आहारात हंगामी भाज्या, फळे, धान्ये इत्यादींचा समावेश करा आणि अतिरिक्त मीठ, साखर आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांपासून दूर रहा. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

  • नियमित आणि वेळेवर अन्न खा. दुपारचं जेवण स्किप करू नका.  

  • दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या. 

  • तणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी योगा, ध्यान, व्यायाम करा. 

  • रोज काही वेळ नियमित व्यायाम करा. यामुळे तुम्हाला बराचसा फरक जाणवेल. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : स्वयंपाकाच्या तेलाचा तुमच्या आरोग्यावर होतोय खोलवर परिणाम; आजच 'या' आरोग्यदायी पर्यायांनी बदला