Health Tips : अनहेल्दी आहार आणि बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आज प्रत्येक तिसरा व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहे. उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे हृदयविकार, किडनी निकामी होणे आणि इतर अनेक समस्यांचा धोका असतो. इतकेच नाही तर उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांवरही परिणाम होतो, त्यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी सामान्य करणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णाने आपल्या आहारात आणि जीवनशैलीत विशेष बदल करणे आवश्यक आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती पेयांबद्दल सांगणार आहोत, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.


आल्याचा चहा


आल्याचा चहा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे. हा चहा घरी बनवणं देखील खूप सोपे आहे. यासाठी पॅनमध्ये पाणी गरम करा आणि त्यात आल्याचे तुकडे घाला. उकळी आल्यावर हे पाणी गाळून घ्या. चवीसाठी तुम्ही या चहामध्ये एक चमचा मधही मिसळू शकता. हा चहा उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.


ग्रीन टी


अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध ग्रीन टी उच्च रक्तदाब सामान्य करण्यास मदत करू शकते. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात ग्रीन टीचा समावेश करावा. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.


हिबिस्कस चहा (जास्वंदाच्या पानांचा चहा)


हिबिस्कसमध्ये अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स नावाची संयुगे असतात, जी उच्च रक्तदाब नियंत्रित करतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही हिबिस्कस चहा पिऊ शकता, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा चहा करण्यासाठी, कोरड्या हिबिस्कसच्या पाकळ्या पाण्यात घाला आणि उकळवा, नंतर गाळून घ्या आणि गरम किंवा थंड प्या.


डाळिंबाचा रस


उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी डाळिंबाचा रस खूप उपयुक्त ठरतो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल रक्त पातळ करण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब सामान्य होतो.


चिया सीड्सचे पाणी


चिया सीड्समध्ये अनेक गुणधर्म आढळतात. जे उच्च रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यासाठी चिया सीड्स अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. तुम्ही या पाण्याचा आहारात समावेश करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर