मुंबई : निर्जीव केस पाहिल्यावर अनेकांनाच चिंता वाटते. पण, तुम्हाला माहितीयेका केसांना फाटे फुटणे, केस मोठ्या प्रमाणावर गळणे यावरील एक दमदार उपाय हा तुमच्याच स्वयंपाकघरात दडला आहे. रसायनांचा भडीमार असणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर तुम्ही केला असेल, पण आता मात्र पूर्णपणे घरगुती उपाय करुन तुम्ही केसांचं सौंदर्य आणखी खुलवू शकता. यामध्ये तुम्हाला मदतीस येणार आहे ते म्हणजे स्वयंपाकघरात असणारं तूप. 


भारतीय पाकशास्त्रामध्ये तूपाला फार महत्त्वं आहे. आयुर्वेदात उल्लेख करण्यात आलेल्या मौल्यवान साहित्यामध्येही तुपाचा समावेश होतो. त्वचा आणि केसांसाठी तर तूप म्हणजे जणू एक वरदान. रासायनिक उत्पादनांकडे पाठ फिरवून नैसर्गिक उपाय करण्याचा तुमचा मनसुबा असल्यास तूप हा एक उत्तम पर्याय ठरेल. 


केसांमध्ये गरम (कोमट) तुपानं मालिश केल्यास डोक्याच्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळं केसांच्या वाढीस चालना मिळते. तुपामध्ये औषधी द्रव्यंही आहेत, जी त्वचेमध्ये सहजपणे शोषली जातात. डीप कंडिशनिंग करुन  रुक्ष आणि निर्जीव केसांमध्ये तुपामुळं पुन्हा एक वेगळीच चमक येते. केसांना तूप लावल्यानंतर शॉवर कॅपच्या सहाय्यानं केस झाकून रात्रभर ते तसेच ठेवावे आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं ते धुवून घ्यावेत. 


Health Tips: योगासनं करताना करा या चार नियमांचे पालन


हेअर कलर आणि इतरही अनेक प्रक्रियांमुळं केसांची नैसर्गित चमक आपण गमावून बसतो. पण, तुपाच्या मदतीनं ती चमक परत मिळवता येऊ शकते. यासाठी एक चमचा तूप केसांच्या मुळाशी चोळून काही तासांनंतर केस स्वच्छ धुवावेत. याचे परिणाम जाणून घेण्यासाठी एक आठवड्यातून दोनदा असं करुन पाहा.