Health Tips : हिवाळा (Winter Season) ऋतू सुरु झाला आहे. या हवामानात सकाळी उठणे कठीण आणि कंटाळवाणे असे दोन्ही वाटते. रात्री जरा लवकर झोपल्यास सकाळी लवकर उठण्याचे काम थोडे सोपे होऊ शकते. पण सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात केल्याने तुम्हाला बरे वाटेलच पण ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते.

या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल. ही छोटी-छोटी कामे करून तुम्ही दिवसभर व्यवस्थितपणे कामे करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात.

दिवसाची सुरुवात पाण्याने करा

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, रोज उठल्यानंतर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. किमान एक ग्लास पाणी प्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पाण्यात मध, लिंबू किंवा हळदही टाकू शकता. पाणी प्यायल्यानंतरच चहा किंवा कॉफी प्या.

ओमेगा 3 चे सेवन करा

शारीरिक आरोग्याबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर बनवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा आहारात समावेश करा. यासाठी तुम्ही रोज रात्री अक्रोड भिजवून सकाळी खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास, आपण जवसाचं तेल देखील वापरू शकता.

ध्यान करा

अनेकदा सकाळी लवकर ऑफिसला जाण्यामुळे ध्यानासाठी वेळ मिळत नाही. पण एक नियम बनवा की ब्रश केल्यानंतर 10 मिनिटे ध्यान करा. ध्यान केल्याने आरोग्य चांगले राहण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते.

सूर्यनमस्कार करा

हृदय आणि मनाला शांती देण्यासाठी सूर्यनमस्कार करा. दररोज सुमारे 7 मिनिटे वेळ काढणे आणि सूर्यनमस्कार करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सूर्यनमस्कार केल्याने, चक्रे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या दिनश्चर्येत या गोष्टींचा समावेश जरी केला तरी ते तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतील. आणि तुम्ही निरोगी राहू शकाल. त्यामुळे आजपासूनच निरोगी आयुष्याची सुरुवात करा. जेणेकरून पुढे त्रास होणार नाही. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात