Green Tea : वजन कमी करण्यासाठी अनेकजण ग्रीन टीचे सेवन करतात. कारण ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही प्रभावी आहे. त्याच वेळी, ग्रीन टी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. अशा वेळी अनेक लोक दिवसातून अनेक वेळा विचार न करता ग्रीन टीचे सेवन करतात. त्यामुळे दिवसभरात तीन कप पेक्षा जास्त ग्रीन टीचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान नेमके कोणते जाणून घ्या.
ग्रीन टी पासून होणारे नुकसान :
पोटाशी संबंधित समस्या - ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ, गॅस इत्यादी समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे तत्व असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात ऍसिडिटी होऊ शकते.
डोकेदुखीची समस्या - दिवसातून 2 वेळेपेक्षा जास्त ग्रीन टीचे सेवन केल्याने डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. परंतु जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्याल तर त्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. यामुळे डोकेदुखीची समस्या खूप वाढू शकते.
झोपेच्या समस्या - कॅफिनचे जास्त सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते. जरी ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूपच कमी असते, परंतु जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होतो. यामुळे मेलाटोनिन हार्मोनमध्ये असंतुलन होऊ शकते. ज्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.
हाडे कमजोर होतात - ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने माणसाची हाडे कमकुवत होतात. ग्रीन टीमध्ये असलेले संयुगे कॅल्शियमचे शोषण कमी करू शकतात. ज्याचा तुमच्या हाडांवर परिणाम होऊ शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha