Health Tips : ब्लॅकबेरीची (Blackberry) चव ही इतकी वेगळी आहे की कधी ती आंबट लागते तर कधी गोड लागते. ब्लॅकबेरीचा वापर अनेक पदार्थांत केला जातो. कधी मिल्कशेकसह तर कधी आईस्क्रिमसह ब्लॅकबेरी लोकांना खायला आवडते. ब्लॅकबेरी हे व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज यांसारख्या खनिजे आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असलेले फळ आहे जे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. ब्लॅकबेरी जरी दिसायला लहान असली तरी या लहान फळामुळे मिळणारे फायदे अनेक आहेत. हे फायदे नेमके कोणते ते जाणून घ्या. 


ब्लॅकबेरीचे शरीरासाठी 'हे' फायदे आहेत :


मेंदूच्या आरोग्याशी ब्लॅकबेरीचा संबंध 


जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, ब्लॅकबेरी हे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी जबाबदार अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध फळ आहे. फ्री रॅडिकल्स हे असे पदार्थ आहेत जे मेंदूसह महत्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. वर नमूद केलेल्या अभ्यासानुसार, ब्लॅकबेरी वय-संबंधित न्यूरोडीजनरेशनची शक्यता कमी करण्यास मदत करते. 


क्रॅनबेरीच्या सेवनाने दातांच्या आरोग्यालाही फायदा होतो.


ब्लॅकबेरी हे एक परिपूर्ण फळ आहे. यामुळे मेंदूच्या चालनेला तर फायदा होतोच पण त्याचबरोबर याच्या सतत सेवनाने दातांनाही फायदा होतो. ब्लॅकबेरीमध्ये काही बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. 


क्रॅनबेरी खा आणि निरोगी त्वचा ठेवा


ब्लॅकबेरी खाल्ल्याने त्वचादेखील निरोगी आणि सुंदर चमकदार राहते. कारण ब्लॅकबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. सर्दी आणि फ्लू टाळण्यासाठी व्हिटॅमिन सीचे सेवन देखील महत्त्वाचे आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha