Health Tips : आजकाल प्रत्येकजण फिटनेसबाबत फार गंभीर आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक खाण्याच्या योग्य सवयी आणि वर्कआउटवर भर देत आहेत. मात्र, असे असूनही, लठ्ठपणा अनेकांसाठी एक समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. खरंतर, वजन कमी करणे खूप आव्हानात्मक आहे. आजकाल वजन कमी करण्यात कॉफी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जाते. काही लोक ब्लॅक कॉफी पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक मिल्क कॉफी पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. ब्लॅक आणि मिल्क कॉफी मधील वजन कमी करण्यासाठी कोणती चांगली आहे हे जाणून घ्या.
वजन कमी करण्यात ब्लॅक कॉफीची भूमिका
ब्लॅक कॉफी ही मेटाबॉलिज्म बूस्टर आहे. हे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असे मानले जाते. ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफीन चयापचयाला तात्पुरती गती देण्याचे काम करते, ज्यामुळे कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न होतात. ब्लॅक कॉफी भूक कमी करण्याचेही काम करते. मात्र, त्यासाठी भरपूर संतुलन आवश्यक आहे.
वजन कमी करण्यासाठी मिल्क कॉफी किती प्रभावी आहे?
मलईदार आणि चवदार मिल्क कॉफी देखील वजन कमी करण्यास मदत करू शकते. दुधाच्या कॉफीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे ब्लॅक कॉफीपेक्षा हा उत्तम पर्याय मानला जातो. कॅलरीजचे सेवन नियंत्रित करण्यासाठी, कमी फॅट किंवा स्किम्ड दूध असलेली कॉफी प्यावी. तसेच, उच्च कॅलरीजमुळे, मिल्क कॉफी ब्लॅक कॉफीप्रमाणे चयापचय वाढवत नाही. असे असूनही, ते आपल्या आहारात संतुलित ठेवले पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी कोणती कॉफी सर्वोत्तम आहे?
आता, जेव्हा ब्लॅक आणि मिल्क दोन्ही कॉफी वजन कमी करण्यास मदत करते, तेव्हा कोणती अधिक प्रभावी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर, तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही कॉफी पिऊ शकता. मात्र, ब्लॅक कॉफी किंवा मिल्क कॉफीमुळे वजन कमी होईल, असे नाही. याबरोबरच योग्य आहार आणि व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :