Health Tips : सध्याच्या धकाधकीच्या काळात कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) प्रमाण वाढत चाललं आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त असणं हे हृदयविकाराचं लक्षण असू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने पक्षाघाताचा धोका जास्त वाढतो. मात्र, रोजच्या जीवनात आपल्या अशा काही सवयी आहेत. ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतो. आता यावर नियंत्रण कसं मिळवायचं याच संदर्भात आम्ही तुम्हाला खास माहिती सांगणार आहोत. 

Continues below advertisement


खराब कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा फॅट आहे जो शरीरात वाढतो आणि यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, टाईप-2 मधुमेह यांसारखे अनेक आजारही वाढतात. त्यामुळेच अनेकदा असं म्हटलं जातं की खराब कोलेस्ट्रॉलमुळे केवळ आजारच होत नाहीत तर जीवाला धोकाही निर्माण होतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतो. अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.  


कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे


शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य ठेवण्यासाठी, आपण निरोगी आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे. थोड्याशा निष्काळजीपणामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. पॅकेज केलेले स्नॅक्स, दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहार मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतो.


शारीरिक हालचाल कमी करणे 


ज्या लोकांची शारीरिक हालचाल कमी असते त्यांच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. व्यायामामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. 


दारू पिणे


जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे हृदयाचे खूप नुकसान होते. 


लठ्ठपणा


लठ्ठपणा हे अनेक रोगांचे मूळ आहे. जर तुमचे वजन वेगाने वाढत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त वाढल्याने शरीराला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत वजनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. 


धूम्रपान 


जे लोक भरपूर सिगारेट ओढतात त्यांनाही वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. याशिवाय हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते. 


जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर या टिप्स फॉलो करा


लसूण


दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी लसूण खा. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येईल. 


हिरवा चहा


दररोज ग्रीन टी प्यायल्याने अनेक फायदे होतात. ग्रीन टीमध्ये वजन नियंत्रित करणारे अनेक घटक असतात. 


हळदीचे दूध


हळदीचे दूध प्यायल्यानेही शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुमच्या 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते; सुटका मिळवण्यासाठी 'हे' व्यायाम करा