Health Tips : दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरासह अनेक भागांत गेल्या तीन दिवसांपासून धुकं पसरलं आहे. झपाट्याने वाढते प्रदूषण (Air Pollution) हा लोकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. प्रदूषित हवा श्वास घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. त्यामुळे अनेकांना डोळ्यांची (Eyes) जळजळ, श्वास घेण्यास त्रास, खोकला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागतंय. अशा परिस्थितीत, गॅस चेंबर बनलेल्या शहरांमध्ये राहण्यासाठी काही आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण या समस्या टाळता येतील.


वाढते प्रदूषण आणि प्रदूषित होणारी हवा याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुफ्फुसावर आणि श्वसनसंस्थेवर होतो. अशा स्थितीत फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी योग्य खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही पेयांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यास मदत करतात.


हळदीचे दूध


औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेली हळद अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. यामध्ये असलेल्या कर्क्यूमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि फुफ्फुसातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. अशा स्थितीत दुधात हळद मिसळून प्यायल्याने खूप फायदा होतो.


बीटचा ज्यूस 


अॅनिमियावर मात करण्यासाठी लोक अनेकदा बीटाचं सेवन करतात. तसेच, बीट तुमच्या फुफ्फुसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्सने समृद्ध, बीट फुफ्फुसाचे कार्य आणि ऑक्सिजन पातळी सुधारण्यास मदत करू शकते.


ग्रीन टी


वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा ग्रीन टीला आपल्या आहाराचा भाग बनवतात. पण, फार कमी लोकांना हे माहित असेल की ते तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हे कॅटेचिन नावाच्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, ज्याचा फुफ्फुसाच्या ऊतींवर दाहक-विरोधी आणि संरक्षणात्मक प्रभाव असतो.


लिंबू सह गरम पाणी


लिंबू व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, जो फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो. जर तुम्हाला तुमची फुफ्फुस मजबूत करायची असतील तर कोमट पाण्यात लिंबू मिसळून हे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी