Health Tips : गर्भधारणा (Pregnancy) ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि खास क्षण असतो. आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी नवीन आयुष्याची सुरुवात असते. पण, गर्भधारणेचा काळ जेवढा आनंदाचा असतो, काही वेळा तो तितकाच कठीणही असतो. बाळाला नऊ महिने पोटात ठेवताना आईला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
गरोदरपणात महिलांना वेदना होत असताना, त्यांना गॅसचा त्रास होणे देखील सामान्य आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढल्याने अधिक गॅस तयार होऊ लागतो. यामुळेच या काळात महिलांना अॅसिडीटीचा त्रास होतो. गर्भधारणेदरम्यान अॅसिडिटीचा त्रास काही वेळा असह्य होऊ शकतो. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा याचविषयी या ठिकाणी आपण अधिरक माहिती जाणून घेणार आहोत.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
गरोदरपणात अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यास सुरुवात करावी. गर्भधारणेच्या अवस्थेत दररोज किमान तीन लिटर पाणी प्यावे असे डॉक्टर सांगतात. याचा फायदा मुलालाही होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गरोदरपणात जास्त गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळूहळू पाणी प्यावे.
मेथीचे दाणे
गॅसच्या समस्येवर मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात. हा घरगुती उपाय फार पूर्वीपासून वापरला जात आहे. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्यायला खूप फायदा होतो.
आलं आणि पुदिन्याचा चहा
त्याचबरोबर पुदिना आणि आल्याचा चहा प्यायल्यास पचनाच्या समस्येपासून आराम मिळतो. विशेषत: अॅसिडिटीच्या समस्येवर हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अॅसिडिटीसाठी तणाव हे देखील एक कारण आहे. त्यामुळे गरोदरपणात शक्य तितका कमी ताण घ्या. जर तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी टेन्शन फ्री राहणं खूप गरजेचे आहे. हे उपाय केल्याने तुम्हाला गरोदरपणात अॅसिडीटीची समस्या जाणवणार नाही. तसेच, तुमचं आरोग्यही निरोगी राहण्यात मदत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :