मुंबई: चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो. पण या छोट्याशा वेलचीचे तसे बरेच फायदे आहेत. छोट्या दिसणाऱ्या वेलची जाणून घेऊयात मोठे फायदे.

 

पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो.

 

याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेलचीच्या सेवनानं सेक्स लाइफमध्ये सुधारणा होऊ शकते. वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते. त्यामुळेच वेलची सेवन करणं चांगलं मानलं जातं.

 

वेलचीमध्ये आवश्यक घटक असल्यानं त्यामुळे नपुंसकता, इरेक्टारइल डिस्फंक्शन और इंफर्टिलिटी यासारख्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. वेलचीमध्ये आर्यन, व्हिटामिन सी, रिबोफ्लोविन आणि नियासिन यासारखे पोषक द्रव्य यात असतात. तसेच वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं.

 

घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो. तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते.