केसगळतीवर कलोंजी रामबाण उपाय
कलोंजीच्या तेलाचा वापर केल्यास केसगळती कमी होते. केसगळती थांबवण्यासाठी एक चमचा कलोंजीचं तेल, दोन चमचे कस्टर्ड ऑईल आणि बदामाच्या तेलाचे मिश्रणाने रोज डोक्याला मसाज करावा. या मिश्रीत तेलाचा रोज रात्री झोपताना वापर केल्यास, डोक्याची केसगळतीची कमी होईल.
ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे, त्यांनी व्हिनेगर, मध आणि कलोंजीच्या तेलाच्या मिश्रणाचा लेप लावला, तर त्यांना सांधेदुखीपासून आराम मिळतो.
याशिवाय कलोंजीच्या तेलाचा उपयोग काही दुर्धर आजारावरही होतो. मधूमेहाच्या रुग्णांनी ब्लॅक टीमध्ये एक चमचा कलोंजीच्या बियांची पूड घालून पिल्यास मधूमेह रुग्णांची साखर नियंत्रित राहते.
सर्वसाधारणपणे कलोंजीचा वापर लोणच्यांसाठी होतो. मात्र, त्याच्या बिया आणि तेलाच्या वापराचे अनेक फायदे आहेत.
कलोंजी हा भारतासहित दक्षिण-पश्चिम अशियाई भूमध्य समुद्राच्या किनारी भागात उत्पादित होणारा पदार्थ आहे.