व्हॅलेंटाईन डे प्रत्येक प्रेमी जोडप्यासाठी खूप खास दिवस असतो. वर्षभर लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन डे वर प्रेमी युगुल ऐकमेकांना भेटून आपल्या पद्धतीने हा दिवस खास बनवतात. आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. यामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पद्धतही बरीच बदलली आहे. यापुढे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जोडप्यांना भेटून एकमेकांना शुभेच्छा देण्याची आवश्यकता राहिलेली नाही.


सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एखाद्या खास व्यक्तीला किंवा मित्राला व्हॅलेंटाईन डे मेसेज पाठवण्याचा ट्रेंड जोर धरत आहे. आपणसुद्धा असा विचार करत असाल की या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण आपल्या मित्रांना आणि स्पेशल वन ला व्हॉट्सअ‍ॅपवर भरपूर मेसेज पाठवायचे आहेत तर आम्ही यात आपल्याला मदत करू शकतो. आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डेसाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत.


व्हॅलेंटाईन विशेष संदेश 2021


व्हॉट्सअ‍ॅपवरचे फॉरवर्ड संदेश पाठवू नका
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देताना व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला आलेला संदेश आपल्या खास व्यक्तीला पाठवू नका. कारण, असे फॉरवर्ड संदेश कुणालाच फार आवडत नाही. शिवाय फॉरवर्ड मॅसेज दिसल्यास त्याला कुणी गांभीर्यानेही पाहत नाही. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साठी तुमच्या शब्दात तुमच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती तुम्हाला लाईक करत असेल तर तुमच्या मोडक्यातोडक्या शब्दातही तिला प्रेम जाणवेल.


Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा..


योग्य इमोजींचा वापर करा.
आज प्रत्येक सोशल साईटवर बोलण्यासाठी इमोजींचा वापर करण्यात येतो. तुम्हीही अशा इमोजी संदेश पाठवताना वापरू शकता. मात्र, इमोजी वापरताना त्याचा काय अर्थ होतो? हे अधी तपासा नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. चुकीचा इमोजी पाहून समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते.


मनापासून व्यक्त व्हा
आपल्या मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. कारण, कोणत्याही व्यक्तीला नात्यात सच्चेपणा हवा असतो. तुमच्याकडून पूर्ण न होणारी आश्वासने देऊ नका. समोरच्या व्यक्तीला ते आवडणार नाही.