Happy New Year 2024 : 2023 हे वर्ष संपून नवीन वर्ष (Happy New Year 2024) सुरु व्हायला अवघे काही तासंच शिल्लक राहिले आहेत. अशातच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नवीन वर्ष म्हटलं की एक प्रकाराचा आनंद, उत्साह, आशेचा किरण, नवीन ध्यास आणि नवीन संकल्प. आता सण म्हटला की मित्र-मंडळींना, नातेवाईकांना शुभेच्छा देणं साहजिकच आहे. त्यामुळे नवीन नर्षाच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा नातेवाईकांना शुभेच्छा द्यायच्या असततील तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश (Message) घेऊन आलो आहोत. हे शुभसंदेश तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता तसेच सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. 


नवंवर्षानिमित्त तुमच्या मित्र-मंडळींना 'हे' द्या खास शुभेच्छा संदेश...


1. गेलं ते वर्ष, 
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा 
घेऊन आले 2024 साल !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


2. येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, नव्या वर्षाच्या या शुभदिनी..


3. दाखवून गत वर्षाला पाठ 
चाले भविष्याची वाट 
करुन नव्या नवरीसारखा थाट 
आली ही सोनेरी पहाट!!


4. नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, 
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..


5. आपली सर्व स्वप्न, आशा, 
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


भारतात 'या' दिवसांनाही साजरा केला जातो न्यू ईयर 


भारतात  1 जानेवारी बरोबरच अनेक वेगळा न्यू ईअर साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी नव वर्ष साजरे केले जाते. हवामानानूसार, ऋतूनुसार तसेच लूनार आणि  राष्ट्रीय (सौर) कॅलेंडरनुसार भारतात वेगवेगळ्या दिवसांना नववर्ष लोक साजरे करतात. बैसाखीच्या दिवशी भारतातील उत्तर आणि मध्य भागात नववर्ष साजरे केले जाते. तर लूनार कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात उगादी आणि  महाराष्ट्रात  गुढी पाडवा हे सण साजरे करून नव वर्षाचे स्वागत केले जाते. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Happy New Year 2024 : नवीन वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा घालवणार? 'हे' 4 उपाय करा