Happy New Year 2024 : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच तरूण मंडळींपासून ते घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची (Happy New Year) तयारी पाहायला मिळतेय. नवीन वर्षाच्या आधी संध्याकाळी, म्हणजे 31 डिसेंबरला, लोक साजरे करतात आणि पार्टी करतात. कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांबरोबर मजा करताना लोक खूप मद्यपान करतात. पण काही वेळा अति पार्टी केल्यामुळे लोकांना हँगओव्हर होतो.


ज्यामुळे बहुतेक लोकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोकेदुखी आणि हँगओव्हरचा सामना करावा लागतो. स्वतःबरोबरच ही इतरांसाठीही समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल, तर हँगओव्हरला सामोरे जाण्यासाठी आधीच व्यवस्था केली पाहिजे. हँगओव्हर उतरवण्यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 


इलेक्ट्रोलाईट पाणी प्या


जर तुम्ही पार्टीदरम्यान जास्त ड्रिंक घेतलं असेल तर हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्ही मिनरल वॉटर किंवा इलेक्ट्रोलाईट पाणी पिऊ शकता. त्यामुळे हँगओव्हरपासून लवकर सुटका होईल आणि पेयाचा प्रभावही कमी होईल.


लिंबूवर्गीय फळे


लिंबूवर्गीय फळे देखील हँगओव्हरवर लवकर आराम मिळवण्यसाठी फार फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला जास्त हँगओव्हर असल्यास, लिंबू पाणी किंवा सायट्रिक फळांचा रस उपयुक्त ठरू शकतो. व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असलेल्या या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातून विषारी आणि मादक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.


नारळ पाणी (Coconut Water)


कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नारळपाणी पिऊनही हँगओव्हरपासून आराम मिळतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अल्कोहोल प्यायल्याने शरीराचे निर्जलीकरण होते. ज्यामुळे हँगओव्हरचा धोका वाढतो. नारळ पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे तुम्ही हँगओव्हर उतरविण्यासाठी नारळ पाणी पिऊ शकता. 


आलं (Ginger)


आलं खाल्ल्याने पार्टी हँगओव्हरपासून सुटका मिळण्यासही मदत होते. तुम्ही आल्याचे तुकडे करून ते चघळू शकता किंवा आल्याचा चहा किंवा त्याचा डेकोक्शन बनवून पिऊ शकता. यामुळे हँगओव्हरपासून सुटका करणे सोपे होईल.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Happy New Year 2024 : भारतात नवीन वर्ष एकदा नव्हे तर 5 वेळा साजरे करतात; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण