New Year 2023 : 2022 (Year 2022) या वर्षाचा निरोप घेण्यासाठी जगभरात जय्यत तयारी सुरू आहे, यासोबतच आपण सर्वजण नवीन वर्ष 2023 (New Year 2023) चे नव्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत, पण तुम्हाला माहित आहे का? की जेव्हा आपण 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजता नवीन वर्ष साजरे करत असतो, नाचत असतो आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो, तोपर्यंत अनेक देशांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा साजरे केलेले असतात, त्याचे कारण त्या देशाचे भौगोलिक स्थान आहे. जगात कोणत्या देशातील लोक नवीन वर्ष प्रथम साजरे करतात आणि कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे करण्याची संधी सर्वात शेवटी येते? जाणून घ्या


31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच नवीन वर्षाचा जल्लोष सुरू


जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच नवीन वर्षाचा जल्लोष सुरू होतो. लोक आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करतात. येणारे नवीन वर्ष जगभरात विविध प्रकारे साजरे केले जाते. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यानंतर भारतात नवीन वर्षाचे आगमन होते, परंतु असे अनेक देश आहेत जिथे दिवस लवकर सुरू होतो. 



नवीन वर्षाचे स्वागत सर्वप्रथम 'या' देशात..! तर सर्वात शेवटी..


ओशनिया प्रदेशातील लोक प्रथम नवीन वर्षाचे स्वागत करतात. यापैकी टोंगा, सामोआ आणि किरिबाटी हे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत. टोंगा या पॅसिफिक बेटावर नवीन वर्षाचा दिवस पहिला येतो, याचा अर्थ नवीन वर्ष साजरा करणारा पहिला देश आहे. भारतीय वेळेनुसार, सामोआ आणि ख्रिसमस बेट/किरिबाटी येथे 31 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता नवीन वर्षाची सुरूवात होते. आशियाई देशांमध्ये नवीन वर्षाचे स्वागत सर्वप्रथम जपान आणि दक्षिण कोरियामध्ये केले जाते. येथे 31 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता नवीन वर्ष सुरू होते. त्याच वेळी, नवीन वर्ष यूएस मायनर आउटलाइंग बेटावर सर्वात शेवटी साजरे केले जाते. भारतीय वेळेनुसार, 1 जानेवारीच्या संध्याकाळी 5:35 वाजता साजरा केला जातो.



'हा' देश भारतापेक्षा 7 तास 30 मिनिटे पुढे धावतो
नवीन वर्ष साजरे करणारा या पृथ्वीवरील पहिला देश टोंगा हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूह आहे. टोंगा भारतापेक्षा 7 तास 30 मिनिटे पुढे धावतो. म्हणजेच, 31 डिसेंबर रोजी, जेव्हा भारतात दुपारी 4:30 वाजले असतील, त्याच वेळी टोंगामध्ये म्हणजेच 01 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्ष सुरू होईल. होय, हा जगातील पहिला देश आहे, जिथे नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. यानंतर सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो. युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर द्वीप समूह, अगदी शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करते. येथील लोक नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (जीएमटीनुसार) किंवा संध्याकाळी 05.30 (भारतीय वेळेनुसार) करतात.


 


या देशांमध्ये GMT नुसार, यावेळी 31 डिसेंबर (2022) रोजी नवीन वर्ष साजरे केले जाईल


न्यूझीलंड: सकाळी 10.15


ऑस्ट्रेलिया (बहुतेक प्रदेश) : दुपारी 01.00


जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया : दुपारी 03.00


चीन, फिलीपिन्स आणि सिंगापूर: संध्याकाळी 04.00


बांगलादेश : संध्याकाळी 06.00


नेपाळ : संध्याकाळी 6:15


भारत आणि श्रीलंका : संध्याकाळी 06:30


पाकिस्तान : संध्याकाळी 07.00


जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि स्पेन : रात्री 11.00


यूके, आयर्लंड, आइसलँड, पोर्तुगाल : सकाळी 00.00


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)