Chocolate Day :  फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेल्यांसाठी विशेष असा असतो. अनेकजण या व्हॅलेंटाईन वीकची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या रोज डे पासून होते. या वीक मधील प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व आहे. आजचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी हा चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो. प्रेमाचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी साजरा करण्यात येतो.


जोडीदारावरच प्रेम व्यक्त करण्यासाठी चॅाकलेटसारखा दुसरा पर्याय नाही. आज बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेटचे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी चॉकलेट घेणार असाल तर डार्क चॉकलेट किंवा ज्यामध्ये कोकोचे प्रमाण जास्त आहे, असे चॉकलेट खरेदी करा.


आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही स्पेशल डायलॉगच्या माध्यमातून देखील इंप्रेस करु शकता. जसे की, "जिंदगी की किताब में कुछ पन्ने खास होते हैं, कुछ अपने तो कुछ बेगाने होते हैं, प्यार से संवर जाती है जिंदगी, जब रिश्तों में चॉकलेट की तरह मिठास होती है.


"कुछ मीठा हो जाये, कुछ प्यार हो जाये, मोहब्बत अपनी बेशुमार हो जाये, दिन है चॉकलेट डे का, तो चलो आज कुछ मीठा हो जाये."


अशा काही डायलॉगचा वापर केल्याने तुमचे प्रपोज अधिक खुलण्याची शक्यता आहे.


चॉकलेट खाण्याचे फायदे


चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. 'डार्क चॉकोलेट' खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.


Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना?