मुंबई : आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ही आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी. आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन. यंदा गुरुपौर्णिमा 21 जुलैला आहे. यावर्षी  गुरुपौर्णिमा 21 जुलै 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. गुरुपौर्णिमा 20 जुलै रोजी संध्याकाळी 5:59 पासून सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी 3:46 वाजता संपेल. (Guru Purnima Wishes in Marathi 2024)


गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंसाठी खास संदेश (Guru Purnima Wishes 2024)


हिंदू धर्मात गुरुला विशेष स्थान आहे. आपल्या जीवनात आई पहिली तर वडिल दुसरे गुरु असतात. आपल्या जीवनात पहिले स्थान आईसाठी (Mother), दुसरे वडिलांसाठी (Father), तिसरे गुरूसाठी राखीव आहे. गुरु आपल्यासाठी पूजनीय आहेत. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हीही तुमच्या गुरुंना शुभेच्छा संदेश पाठवू शकता. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (Guru Purnima Wishes) पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना तुमच्या जीवनातील त्यांचे खास स्थान दाखवू शकता. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंसाठी काही खास संदेश जे तुम्ही पाठवू शकता.


गुरूपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Guru Purnima Wishes in Marathi )


गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः


आई-बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु
तुमच्यापासून माझे जग हे झाले गुरु


स्वत:चा विचार न करता
माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा


गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ
आई-बाबा आहात तुम्ही माझे
पण आहात खरे गुरु या आयुष्याचे


आई असते गुरुचे रुप,
बाबा असतात मायेची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा


गुरु हे ज्ञानाच्या महासागराचे द्वारपाल आहेत, 
जे आपल्याला अज्ञानाच्या बंधनातून मुक्त करतात,
त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्यास
जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर विजय मिळतो


जो बनवतो प्रत्येकाला मानव,
जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
अशा गुरुंना आमचा कोटी-कोटी प्रणाम!


गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!


हिऱ्याला पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद  शोधायला शिकवतो  तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!


गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक
आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!