Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक सणाला आपण आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करतो. त्याचप्रमाणे या गुढीपाडव्याला सुद्धा काही खास शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्य़ा नातेवाईकांना, तुमच्या मित्रमंडळींना तसेच आप्तेष्टांना पाठवून तुम्ही तुमचा आनंद शेअर करू शकता. गुढीपाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवरच आहे अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नवे वर्ष, नवी सुरुवातनव्या यशाची, नवी रूजवातगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या आभाळात शोभते उंच गुढीनववर्ष आले घेऊन आनंदाची गोडीगुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वागत करूया नववर्षाचेउभारून उंच गुढी,भरूनी वाहो सुखांनी प्रथममुहूर्ताची आनंदवडीगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्षसर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्षनववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहारहिरवळीने सुगंधित झाली आहे निसर्ग अपरंपार..चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छाहे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं!
महत्वाच्या बातम्या :
- Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
- Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha