Global Hand Washing Day 2023 : दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी “हॅंड वॉशिंग डे” (Global Hand Washing Day 2023) साजरा केला जातो. या दिनाच्या माध्यमातून लोकांना हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले जाते. हा दिवस 2008 मध्ये ग्लोबल हँड वॉशिंग पार्टनर्सने सुरू केला होता. हात धुवण्याचा योग्य मार्ग म्हणजे साबणाने किमान 30 सेकंद हात धुणे. त्यामुळे कावीळ, जुलाब, कुपोषण, पोटातील जंत, निमोनिया, कोरोना असे अनेक आजार टाळता येतात. तुमच्या मुलांनाही हात स्वच्छ धुवण्याचे महत्त्व पटवून सांगा. ही एक अतिशय चांगली स्वच्छता सवय आहे. 


हात धुण्याने 'या' आजारांचा धोका कमी होतो  


अतिसाराचा धोका कमी असतो 


अस्वच्छ अन्न (Unhealthy Food) हे अतिसार आणि आतड्यांसंबंधी संसर्गाचे सर्वात मोठे कारण मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही घाणेरड्या हाताने अन्न खाल्ले किंवा माश्या आणि डास असलेले उघडे अन्न खाल्ले तर पोटाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.


डोळा संक्रमण प्रतिबंध


जर तुम्हालाही अनेकदा डोळ्यांना संसर्ग होत असेल तर त्याचे एक कारण म्हणजे घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे लाल होणे यांसारख्या समस्या दिसू शकतात. अशा परिस्थितीत डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. तीव्र खाज सुटणे किंवा डोळ्यांत काहीतरी गेल्यास, सॉफ्ट टिश्यू किंवा कापड वापरा.


श्वसन संक्रमण प्रतिबंध


खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात धुण्याची सवय तुम्ही पाळली नाही, तर तुम्ही इतरांना संसर्ग पसरवण्यास जबाबदार असू शकता. कारण जेव्हा तुम्ही शिंकल्यानंतर इतरांशी हात मिळवता तेव्हा जीवाणू, विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या हातातून पसरण्याची शक्यता असते. 


त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण


जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण घाणेरड्या हातांनी त्वचेला स्पर्श केल्याने पुरळ, मुरुम आणि खाज येऊ शकते. याची विशेष काळजी घ्या. यासाठी वेळोवेळी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या मुलांनाही हात स्वच्छ धुवण्याचे महत्त्व पटवून द्या. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : ग्रीन टी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर; घरच्या घरी बनवा 'हे' 3 फेस पॅक, काही दिवसांतच फरक जाणवेल