Garlic Tea Benefifts : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. हिवाळ्यात लोक अनेकदा चहा पितात. या चहाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोकांना दुधातला चहा आवडतो तर काहींना ब्लॅक टी, तर काही ग्रीन टी चे चाहते असतात. हिवाळ्यात चहाचे सेवन केल्याने सर्दी टाळता येते. यासाठी लोक आले किंवा इतर प्रकारचा चहादेखील पितात. पण तुम्ही कधी लसणाचा चहा घेतला आहे का? लसणाचा चहा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे. लसणाचा चहा रक्तातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.
तज्ज्ञांच्या मते, लसणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. यामुळे शरीरातील जळजळीपासून आराम मिळतो. तुम्ही यामध्ये दालचीनीही घालू शकता यामुळे चहाची चवही वाढते आणि दालचीनी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.
लसूण चहाचे फायदे :
- शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करते.
- लसणाचा चहा शरीरातील घाण काढून टाकतो.
- हे तुमच्या शरीराचे वजन कमी करण्यास मदत करेल.
- लसणाचा चहा श्वसनाच्या आजारांपासून संरक्षण करतो.
- थंडीत सर्दी, ताप, खोकला बरा होण्यास मदत होते.
- लसणाच्या चहाने हृदयरोग बरा होतो.
- रक्ताभिसरण सुधारते.
असा बनवा लसूण चहा :
एका भांड्यात एक कप पाणी उकळा. त्यानंतर, लसूण ठेचून पाण्यात टाका. त्यानंतर त्यात एक चमचा काळी मिरी टाका. नंतर 5-6 मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि एका भांड्यात चहा गाळून घ्या. त्यानंतर या चहाचा आस्वाद घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
- Omicron Variant : Omicron ची लक्षणे मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये वेगळी असतात, 'ही' लक्षणं दिसून येताच सावध व्हा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha