Ganeshotsav Travel :  बाल भक्तां लागे तूचि आसरा तूचि आसरा...खरंच.. गणेशभक्तांसाठी बाप्पाच्या येण्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. सध्या बाप्पांचं आगमन झालं असून गणेशोत्सवाचा उत्साह अवघ्या देशभर पाहायला मिळत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळाच्या मंडपात बाप्पाची मूर्ती बसवून लोकांनी उत्सवाला सुरुवात केली आहे. देशात तर उत्साहाचे वातावरण आहेत, पण मुंबईत त्याचे विशेष महत्त्व आहे. मुंबईत मराठी संस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे आणि महाराष्ट्रात गणपतीला विशेष स्थान आहे. इतर शहरांमध्ये तुम्हाला काही मोजक्याच ठिकाणी बाप्पाची मूर्ती पाहायला मिळेल, पण मुंबईत जवळपास प्रत्येक घरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.


 


गणेशोत्सवात मुंबई फिरण्याचा विचार करताय?


मुंबईत गणेशोत्सवाचे संपूर्ण 10 दिवस पूजा, आरती आणि भजन केले जाते, ज्यामध्ये सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या उत्सवादरम्यान तुम्ही मुंबई फिरण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज आम्ही तुम्हाला (IRCTC) भारतीय रेल्वेच्या काही टूर पॅकेजेसची सविस्तर माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुकर होईल.


 


मुंबई आणि तिरुपती टूर पॅकेज


IRCTC चे हे पॅकेज 15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला मुंबई आणि तिरुपतीला भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज कल्याण, लोकमान्य टिळक (LTT), मुंबई, पुणे, सोलापूर आणि ठाणे येथून सुरू करण्यात येत आहे.
हे टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे.
पॅकेजमध्ये कॅबने प्रवास करण्याची संधी असेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7390 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7290 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 6500 रुपये आहे.
IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.


 


हैदराबाद आणि मुंबई टूर पॅकेज


या पॅकेजमध्ये तुम्हाला हैदराबाद आणि मुंबईला भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे पॅकेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून सुरू होत आहे.
हे टूर पॅकेज 4 रात्री आणि 4 दिवसांचे आहे.
पॅकेजमध्ये ट्रेनने प्रवास करण्याची संधी असेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 19200 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 18500 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 14700 रुपये आहे.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.



मुंबई गणेश चतुर्थी टूर पॅकेज


हे पॅकेज 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
हे टूर पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे.
पॅकेजमध्ये कॅबने प्रवास करण्याची संधी असेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 15900 आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 15800 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 15000 रुपये आहे.


 


हेही वाचा>>>


Ganeshotsav Travel: कलियुगात गणेशाने घेतला अवतार? एक असं गणेश मंदिर, जिथे 'कल्की' अवतारात होते गणेशाची पूजा, 'या' गोष्टी जाणून आश्चर्यचकित व्हाल


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )