Food : सध्या देशासह राज्यात विविध ठिकाणी उष्णतेचा पारा वाढलाय. उष्णतेच्या वाढत्या झळांनी नागरिक अक्षरश: त्रस्त झालेत. उन्हाळ्यात अन्न पचवणेही खूप कठीण असते. तसेच शरीरात पाण्याची कमतरता देखील जाणवू लागते. यामुळे आम्ही आजच्या लेखात तुम्हाला कलिंगडापासून बनवलेल्या काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे खाण्यास आणि पिण्यास अतिशय चवदार आहेत. तसेच हे पदार्थ बनवायलाही खूप सोपे आहेत. हे पदार्थ तुम्ही मुलांनाही देऊ शकता...


 


उन्हाळ्यात अन्न पचवणे कठीण..!


थंडीच्या मोसमात अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात, जे शरीरासाठीही फायदेशीर असतात. मात्र उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ही समस्या उद्भवते. कारण या ऋतूत अन्न खाणे सोपे असते परंतु अन्न पचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. उन्हाळ्यात कोणी जास्त अन्न खाल्ल्यास आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. यासोबतच तळलेले अन्न खाल्ल्याने लोकांना पाण्याची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे अशक्तपणा दिसू लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक कलिंगडाचे सेवन करतात.




 


कलिंगड ज्यूस


तुम्ही उन्हातून बाहेरून येत असाल आणि तुम्हाला ताजेतवाने असे काही प्यायचे असेल तर कलिंगडचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. हे बनवायलाही खूप सोपे आहे. उन्हाळ्यात तुम्ही ते तयार करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.





कलिंगड मिल्क शेक


उन्हाळ्यात लोकांना याचे सेवन करायला आवडते. दूध आणि टरबूजपासून बनवलेले हे सरबत शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. हे सरबत दुधाचे बनलेले आहे, म्हणून आपण ते दररोज मुलांना खाऊ शकता.




कलिंगड कोशिंबीर


हे सॅलेड तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहे. याशिवाय ते तुम्हाला फ्रेश ठेवते. कलिंगड कोशिंबीर बनवण्यासाठी, थोडंस चीजची आवश्यकता असेल टाकून पाहा, जेणेकरून ते आणखी स्वादिष्ट लागेल.




कलिंगड रायता


या ऋतूत दही सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अशा परिस्थितीत तुम्ही कलिंगड  रायता बनवून सर्व्ह करू शकता. हे बनवल्यानंतर या रायत्यावर कलिंगडचे चौकोनी तुकडे करून सर्व्ह करा.




कलिंगड कुल्फी


उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कुल्फी खायला सगळ्यांनाच आवडते. अशात जर तुम्ही कलिंगडची कुल्फी बनवून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खाऊ घातली तर ते खाल्ल्यानंतर ते तुमची नक्कीच प्रशंसा करतील. यासोबतच याचे सेवन केल्याने त्यांना मस्त वाटेल.


 


 


हेही वाचा>>>


Food : उन्हाळ्यात हे 3 पदार्थ पचायला उत्तम! हलकं काही खायचं असेल तर रेसिपी जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )