Food : मान्सून अवघ्या देशात दाखल झाला आहे. अशा या पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणासोबत आजारांचा धोकाही वाढतोय. उन्हाळा आणि पावसाळा ऋतू हा डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असल्याने या काळात डासांची मोठी दहशत असते. तसेच डेंग्यू हा डासांमुळे होणारा गंभीर आजार आहे, ज्यामध्ये प्लेटलेटची संख्या अनेकदा कमी होते. आपल्या आहारात काही विशेष अन्नपदार्थांचा समावेश केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर...
आजारापासून स्वत:चा बचाव करणे महत्त्वाचे
वातावरणातील बदलामुळे डेंग्यू आणि डासांमुळे होणाऱ्या इतर आजारांच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होतेय. डेंग्यू हा एक सामान्य, परंतु गंभीर आजार आहे, ज्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. भारतातच दरवर्षी डेंग्यूच्यी रुग्णांची संख्या नोंदवली जातेय. अशात या आजारापासून स्वत:चा बचाव करणे महत्त्वाचे आहे आणि जर कोणाला हा आजार झाला असेल तर योग्य माहिती घेऊन वेळीच योग्य उपचार करा. डेंग्यूमुळे रुग्णाच्या प्लेटलेटचे प्रमाण अनेकदा कमी होते. अशा परिस्थितीत आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया असे काही सुपरफूड जे प्लेटलेट्स वाढवतात.
व्हिटॅमिन सी असणारे फूड
संत्री, लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सिमला मिरची यांसारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे सेवन केल्याने प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढते.
व्हिटॅमिन के
रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट्सच्या सुरळीत कार्यासाठी, व्हिटॅमिन के समृद्ध आहार घ्यावा. यासाठी तुम्ही काळे, पालक, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य, शतावरी यासारखे पदार्थ खाऊ शकता, ज्यामध्ये व्हिटॅमिन के आढळते.
फोलेट
व्हिटॅमिन बी 9 किंवा फोलेट समृध्द अन्न देखील प्लेटलेट संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. यासाठी मसूर, बीन्स, एवोकॅडो, विविध धान्य यांसारख्या फोलेटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
असे काही सुपरफूड जे प्लेटलेट्स वाढवतात-
भिजवलेले मनुके
भिजवलेले मनुके हे कमी झालेले प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. यामध्ये असलेले आयर्न प्लेटलेट काउंट वाढवते.
किवी
किवी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले विदेशी फळ आहे, हे फळ प्लेटलेटची संख्या वाढवण्यासाठी देखील खूप प्रभावी म्हणून ओळखले जाते.
बीटरूट
अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेले बीटरूट आरोग्यासाठी अनेक फायदे देते. हे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून प्लेटलेट्सचे संरक्षण करते, ज्यामुळे प्लेटलेटची संख्या वाढते.
डाळिंब
डाळिंब, अँटी-ऑक्सिडंट्स आणि लोहाने समृद्ध, कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करू शकते.
दही
दही केवळ प्लेटलेट काउंट वाढवत नाही तर हाडे मजबूत करण्यास देखील मदत करते. हे खाल्ल्याने बोन मॅरोची प्लेटलेट निर्मिती क्षमता वाढते.
आवळा
अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध, आवळा पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करतो.
पपईचे पान
त्यात असलेले एसिटोजेनिन हे एक प्रकारचे फायटो केमिकल आहे, जे प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी प्रभावी मानले जाते.
हेही वाचा>>>
Food :'अशी कशी देवाची करणी!' नारळाच्या आत पाणी नेमकं येतं कुठून? माहीत नसेल तर जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )