Fashion : नखरेवाली कुठे निघाली...नाकात नथ.. लाखात एक साडी... सध्या सोशल मीडियावर हे गाणं खूप गाजतंय.. साडीचा विषयच तसा खोल आहे. साडी म्हटलं तर महिलांचा जिव्हाळ्याचा विषय.. साडी ही एव्हरग्रीन फॅशनमध्ये राहते. साधारणपणे तुम्हाला त्यात अनेक प्रकारचे डिझाईन्स पाहायला मिळतील. आजही अनेकांना साडी केवळ खास प्रसंगांसाठीच नाही तर रोजच्या वापरासाठीही नेसली जाते. रोजच्या वापरासाठी तुम्ही या साड्या नेसू शकता. ज्या नेसल्यानंतर तुम्ही अगदी भारी दिसाल आणि आरामदायी वाटेल


भारतीय स्त्रीचा सर्वात सुंदर पेहराव... साडी...


साडी हा भारतीय स्त्रीचा सर्वात सुंदर पेहराव आहे. प्रत्येक शरीरयष्टीला, रंगाला शोभेल अशी साडी भारतीय स्त्रियांचे सौंदर्यं वाढवत आले आहे. प्रत्येक प्रांतात साडी नेसण्याची पध्दत, त्यावरचे डिसाईन, कलाकुसर वेगवेगळे आहे. प्रत्येक स्त्रीने साडीवर मॅचिंग दागिने, साजेशी पर्स घेतल्यास तिचे व्यक्तीमत्व अधिक उठून दिसते. फॅशन डिसायनर्समुळे साडी नेसणे एक वेगळेच तंत्र मानले गेले आहे.


 





 


जॉर्जेट साड्या..  ज्या तुम्ही रोज परिधान करू शकता.


जॉर्जेट फॅब्रिक खूप हलके आणि त्वचेला साजेसं आहे. चला तर मग पाहूया जॉर्जेट साडीच्या काही खास डिझाईन्स ज्या तुम्ही रोज परिधान करू शकता. तसेच, आम्ही तुम्हाला या साडी लुक स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत-


 




फ्लोरल प्रिंट साडी डिझाइन


प्रिंटेड जॉर्जेट फॅब्रिकमधील अनेक डिझाइन्स तुम्हाला पाहायला मिळतील. यामध्ये फ्लोरल पॅटर्न किंवा प्रिंट्स घालण्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. या प्रकारची साडी तुम्हाला 1500 रुपयांना सहज मिळू शकते.


टीप: या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही बोहो ज्वेलरी घालू शकता.




बॉर्डर साडी डिझाइन


जॉर्जेट साडीच्या बॉर्डरच्या डिझाईनमध्ये तुम्हाला खूप वैविध्य पाहायला मिळेल. ही साडी डिझायनर अर्पिता मेहता यांनी डिझाईन केली आहे. या प्रकारची प्लेन लेस बॉर्डरची साडी तुम्हाला जवळपास 1000 ते 1200 रुपयांना बाजारात मिळेल.


टीप: तुम्ही या प्रकारच्या लुकमध्ये मोत्याचे दागिने स्टाइल करू शकता.


 




ओम्ब्रे शेडची साडी


आजकाल ओम्ब्रे कलर इफेक्ट खूप पसंत केला जात आहे. यामध्ये तुम्हाला अनेक डिझाइन्स आणि कलर कॉम्बिनेशनच्या साड्या पाहायला मिळतील. यामध्ये इंद्रधनुष्य रंगाचे कॉम्बिनेशन सर्वाधिक पसंत केले जात आहे.


टीप: या प्रकारच्या साडीसह सिल्व्हर दागिने स्टाइल करा.




 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Fashion : लेट्स Chill गर्ल्स..! उन्हाळ्यात दिसा स्टायलिश आणि कूल, 'हे'  आउटफिट्स ट्राय करा, सगळे म्हणतील WOW!