Shani Dev : शनि देवाला (Shani Dev) न्याय देवता म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार शनि त्या व्यक्तीला फळ देतात. शनि दोषात सर्वात क्लेषकारक असते ती म्हणजे शनिची साडेसाती. कारण या साडेसातीच्या दरम्यान व्यक्तींना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. 


शनिची साडेसाती ही साडेसात वर्ष चालणारी ग्रहांची दशा आहे ज्याच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत. शनि सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळुवार गतीने फिरणारा ग्रह आहे. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. या शनिच्या साडेसातीत व्यक्तींना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 


शनि साडेसातीचा परिणाम (Shani Sade Sati Effects)


शनिच्या साडेसातीत व्यक्तींच मानसिकरित्या खच्चीकरण होतं. हे लोक सतत चिंतेत असतात. शनिदेवाला कर्म फळ दाता म्हटलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिची स्थिती शुभ असते त्या लोकांना शनिची साडेसाती फार लाभदायक असते. तर, ज्या लोकांच्या कुंडलीत शनिची स्थिती कमकुवत असेल तर त्यांना साडेसातीमुळे अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. 


शनिच्या साडेसातीत नोकरीत अडचणी, पदोन्नतीत वाढ, व्यवसायात नुकसान, आर्थिक तंगी, कर्जाचं ओझं, शारीरिक अशक्तपणा, थकवा, आळस आणि लोकांचा रोष सहन करावा लागतो. 


शनिच्या साडेसातीत 'ही' कामे करू नका (Shani Sade Sati Precaution)



  • जर एखाद्या व्यक्तीला शनिची साडेसाती लागली असेल तर त्यांनी या काळात कोणतंच आव्हानात्मक काम करू नये. 

  • घरी किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशीही विनाकारण वाद घालू नये. 

  • कोणतंही वाहन चालवताना सतत सतर्क राहा. 

  • खोटं बोलणे, धोका देणे, चोरी करणे, इतरांना त्रास देणे आणि वाईट मार्गाने पैसा कमावणे यांसारख्या सवयींपासून दूर राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. शिळं आणि उष्ट्या अन्नाचं सेवन करू नये. नियोजित वेळी सात्विक भोजन ग्रहण करावे. 

  • ज्या लोकांवर शनिची साडेसाती असते अशा लोकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करू नये. शनिवारी आणि मंगळवारी मांस खाऊ नये. या कालावधीत काळे कपडे आणि चामड्याच्या चपला देखील घालू नयेत. 


शनि साडेसातीचे उपाय (Shani Sade Sati Upay)



  • साडेसातीच्या काळात शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय करावेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही नीलम रत्न घालू शकता. यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो. 

  • शनीच्या वाईट प्रभावांपासून वाचण्यासाठी दररोज हनुमान चालीसा वाचणे अत्यंत उपयुक्त मानले जाते. शनिवारी आणि मंगळवारी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान आणि कपडे दान करा.ज्या लोकांवर साडेसाती आहे त्यांनी दररोज शनि स्त्रोताचे पठण करावे. 

  • गरीब, असहाय्य आणि प्राण्यांची सेवा केल्याने पुण्य मिळते आणि शनिदेव प्रसन्न होतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्यान करणे देखील शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक चांगला मार्ग आहे. शनिवारी काळे वस्त्र आणि तेल दान केल्याने साडेसातीपासून आराम मिळतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 14 April 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींवर राहणार खंडेरायाची कृपा; चौफेर धनलाभाचे संकेत