मुंबई : अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणां आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते.

 

जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यसाठी अजिबात चंगलं नाही. चहा पावडरमध्ये आम्प पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायलं जड जातं. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणं टाळावं.

 

याशिवाय चहामध्ये कॅफिनही असतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचं अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल म्हणजे स्‍टेरॉईड हार्मोन्स वाढवतं. यामुळे शरीरला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यात हृदयासंबंधित आजार, मधुमेह आणि वजन वाढणं इत्यादींचा समावेश आहे.

 

चहामध्ये 'पॉलिफेनोल्स' आणि 'टेनिन' इत्यादी घटक असतात, जे जेवणातील लोह शोषत नाहीत, परिणामी शरीरालाही त्याचा फायदा होत नाही. विशेषत: महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरतात. जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय राहू शकत नाही तर जेवणानंतर किमान एक तासाने प्यावी.