- रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचावं
- झोपण्यापूर्वी मद्यपान करु नये, यामुळेही झोप येत नाही.
- गाणी ऐकण्याची आवड असेल, तर गाणी ऐकावी, गाणी ऐकल्यानेही लवकर झोप लागते.
- 100, 99 अशी उलटी उजळणी म्हणावी, यामुळे एकाग्रता मिळण्यास मदत होते, जेणेकरुन झोप लवकर लागते.
- झोप येत नसेल, तर आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करावं.
- झोपण्यापूर्वी अंघोळ करणं हा देखील चांगला उपाय आहे. यामुळे अजून चांगली झोप लागते.
- एखाद्या तणावामुळे झोप येत नसेल, तर दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, ज्यामुळे तणाव विसरण्यास मदत होईल. जसं की मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत गप्पा मारणं.
तुम्हालाही रात्री झोप येत नाही का? खास टिप्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 May 2017 04:29 PM (IST)
NEXT
PREV
मुंबई : कितीही प्रयत्न केले तरी अनेकांना रात्री झोप येत नाही. झोप पूर्ण नाही झाल्यास कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, शिवाय स्वभाव चिडचिडा बनतो. ज्यांना रात्री झोप येत नाही, त्यांच्यासाठी काही खास टिप्स.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -