Diwali 2023 : सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. नवरात्र, दसऱ्यानंतर आता सगळेजण दिवाळीची (Diwali 2023) आतुरतेने वाट पाहतायत. दिवाळी म्हटलं की, आकर्षक कंदील, दिवे, फटाके, आणि फराळ आठवतात. पण, मिठाईशिवाय सगळेच सण अपूर्ण वाटतात. या दिवसांत बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारची स्वादिष्ट मिठाई मिळते. अर्थात, ही मिठाई विकत घेण्याचा मोह कोणाला आवरत नाही. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही जी मिठाई विकत घेता ती चांगली आहे की भेसळयुक्त आहे? अनेक जणांना या मिठाईमधला फरकच ओळखता येत नाही. अशा वेळी आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही हेल्दी मिठाईबद्दल सांगणार आहोत. जी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता.   


घरगुती गोडाचे पदार्थ तयार करण्यासाठी फार मेहनत नक्कीच घ्यावी लागते. मात्र, क्वालिटीच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली जात नाही. दिवाळी, धनत्रयोदशी आणि भाऊबीजच्या या उत्सवामध्ये तुमच्या मिठाईचा स्वाद घाला. म्हणूनच, या सणासुदीच्या काळात, हे आरोग्यदायी मिठाईचे पर्याय घरी करून पाहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत आपल्या पाहुण्यांचे तोंड गोड करा.


खजूरची मिठाई


दिवाळी किंवा इतर सणांसाठी तुम्ही काजू, बदाम आणि पिस्त्यांपासून बनवलेले हेल्दी डेझर्ट वापरून पाहू शकता. यामध्ये खजुराचा वापर सर्वात जास्त केला जातो. खजूरमध्ये नैसर्गिक साखरेचे गुणधर्म असतात. तुम्ही खजुरात सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून त्यापासून लाडू किंवा मिठाई तयार करू शकता. तसेच, खजुरापासून बनविलेल्या मिठाईची चवही फार वेगळी आणि टेस्टी असते. 


ड्राय फ्रूट डेझर्ट्स


सणासुदीच्या काळात पाहुण्यांचे तोंड गोड करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सची मिठाई बनवू शकता. साखरेसाठी तुम्ही त्यात गूळ वापरू शकता. 


विविध प्रकारचे लाडू


तुम्ही घरच्या घरी बेसनाचे आणि नारळाचे लाडू देखील बनवू शकता. बेसन आणि नारळ हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जर तुुम्हाला या पदार्थांना हेल्दी बनवायचे असतील तर तुम्ही त्यात कमी तेल आणि साखरेचा वापर करू शकता. नारळाच्या लाडूंची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात काजूही टाकू शकता.


घरच्या घरी बनवा काजू कतली   


बाजारात मिळणारी काजू कतली तुम्ही घरीही तयार करू शकता. बाजारातील काजू कतली भेसळयुक्त असण्याबरोबरच त्यात साखरेचा वापर जास्त असतो. तुम्ही ही काजू कतली घरगुती हेल्दी पद्धतींनी तयार करू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Diwali 2023 : दिवाळी येतेय... धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत 'अशी' करा प्रत्येक दिवसाची तयारी; वाचा संपूर्ण लिस्ट