Mansoon Recipe : पावसाळ्यातील वातावरण हे अतिशय थंडावा देणारे आणि अल्हाददायक असते. या वातावरणात गरमारगम चहासोबत काहीतरी मसालेदार खाण्याची ईच्छा अनेकदा होते. मात्र पावसामुळे बाहेर जाता येत नाही. अशा वेळी घरातल्या घरात निवांत खिडकीत बसून पाऊस पाहत चहासोबत मसालेदार आणि खमंग काहीतरी खायला मिळावे असे अनेकांना वाटते. मात्र नेमक्या वेळी काय करावे सुचत नसेल तर ही बातमी तुमच्याकरता आहे. पावसाळ्यात या काही सोप्या रेसेपि नक्की ट्राय करा.
डाळ कचोरी बनवण्यासाठी लागणारी सामग्री
मैदा - 2 कपतेल - 4 ते 5 चमचेतूप - 2 चमचेभिजवलेली उडीद डाळ - 1 वाटीकसुरी मेथी पावडर - 2 टीस्पूनलाल तिखट - 1 टीस्पूनजिरे पावडर - 2 टीस्पूनधने पावडर - 2 टीस्पूनबडीशेप - 2 टीस्पूनओवा - 2 चमचेहिरवी मिरची - 2 तुकडेबेकिंग सोडा - अर्धा चमचाहिंग - चवीनुसारमीठ - चवीनुसार
डाळ कचोरी बनवण्याची कृती
- सर्वात प्रथम एक पातेले घ्या. त्यात मैदा , मीठ आणि तुप टाका. यात पाणी टाकून हे एकत्र मिसळून घ्या.- हे मिश्रण काही वेळ झाकून ठेवा. आता उडीद डाळीची पेस्ट बनवून घ्या.- आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. - तेल गरम झाले की, त्यात ओवा आणि उडीदाच्या डाळीची पेस्ट टाका.- त्यात लाल तिखट , जिरे पावडर , धने पावडर , बडीशेप , मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. - या सगळ्या गोष्टी नीट मिक्स केल्यानंतर त्यात थोडे पाणी मिसळा.- मसाला चांगला शिजल्यानंतर तो थंड होण्याकरता थोडा वेळ बाजूला ठेवा आणि सारण बनवायला घ्या.- मैद्याचे लहान लहान गोळे बनवून घ्या. या गोळ्यात एक चमचा सारण भरा आणि या गोळ्यांना कचोरीच्या आकारात बनवून घ्या.- या कचोरीला गरम तेलात तळून घ्या.- तयार झालेली कचोरी तुमच्या आवडत्या चटणीसोबत खा.
पनीर गोल्डन फ्राय बनवण्यासाठी लागणारी सामग्री
- काॅर्नफ्लाॅवर- मीठ- काळी मिरी पावडर- लाल तिखट- गरम मसाला- कोथिंबीर- पनीर क्युब्स- लिंबू
पनीर गोल्डन फ्राय बनवण्याची कृती
- एका पातेल्यात काॅर्नफ्लाॅवर, मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर आणि पाणी हे सर्व एकत्र करा.- आता या मिश्रणात पनीरचे तुकडे घाला. थोडा वेळ त्याला झाकून ठेवा.- यानंतर तेलात हे पनीरचे तुकडे चांगले तळून घ्या. चवीकरता यावर लिंबाचे काही थेंब टाका. - तयार झालेले पनीर फ्राय गोल्ड केचअप सोबत खा.
इतर महत्वाच्या बातम्या
Health Tips : सोरायसिस आजाराने त्रस्त आहात? 'हे' पदार्थ खाणे टाळा