गुळामध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. गुळात असलेले लोह, व्हिटॅमिन सी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
गुळाचे काही पदार्थांसोबत सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. यामुळे बर्याच आजारांपासून संरक्षण होते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टींसोबत गुळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
गुळ आणि शेंगदाणे
गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळ आणि शेंगदाणे हे आजारांपासून दूर ठेवतात.
Health Tips: पनीरचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी घातक, 'या' लोकांनी तरी दूरचं राहावं
गुळ आणि तीळ
तीळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि झिंक मुबलक प्रमाणात असतात. ते शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत. हिवाळ्यात गुळ व तीळ यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. आपण रोगांपासून सुरक्षित राहू शकता.
तूप आणि गुळ
तूप आणि गुळाचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. या दोघांचे एकत्रित सेवन त्वचेसाठीही खूप चांगले आहे. खासकरुन हिवाळ्यातील आजारांपासून वाचण्यासाठी गूळ व तूप सेवन करणे फायदेशीर ठरते.
Bird Flu India 2021 | सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का?
मेथीचे दाणे आणि गुळ
हिवाळ्यात मेथीचे दाणे आणि गुळ यांचे सेवनही खूप फायदेशीर ठरते. केसांचा त्रास होण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांचे सेवन खूप उपयुक्त आहे.