Coconut Barfi Recipe : 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष सध्या सर्वत्र आहे. बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आता येत्या दोन दिवसांत बाप्पा निरोप घेणार आहे. त्यामुळेच बाप्पासाठी आता वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जात आहे. पण तेच तेच पदार्थ बनवून गृहिणींना कंटाळा आला आहे. त्यामुळे आज जाणून घ्या ओल्या नारळाची बर्फी (Coconut Barfi) बनवण्याची सोपी पद्धत...
ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
- खवा - 250 ग्रॅम
- साखर - 250 ग्रॅम
- खोवलेला नारळ - 2 वाटी
- कोको पावडर - 2 चमचे
- स्ट्रॉबेरी इसेन्स - अर्धा छोटा चमचा
- वेलची पूड - 1 छोटा चमचा
- तूप - 1 चमचा
- चांदीचा वर्थ
ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची कृती
- बर्फी बनवण्याआधी सगळ्यात आधी कढईत तूप घालून खवा परतून घ्यावा.
- खव्यात खोवलेला नारळ घालावा.
- दरम्यान दुसरीकडे साखरेचा पाक बनवून घ्यावा.
- साखरेच्या पाकात खवा आणि नारळाचं मिश्रण घालावं.
- साखरेचा पाक, खवा, नारळाचं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं.
- तयार झालेल्या मिश्रणाचे तीन समान भाग करून घ्यावेत.
- एका भागात कोको पावडर, दुसऱ्या भागात स्ट्रॉबेरी इसेन्स आणि तिसऱ्या भाग पांढरा ठेवावा.
- ताटाला तुपाचा हात लावून कोकोचं मिश्रण थापून घ्यावं.
- त्यावर पांढरा भाग थापावा.
- त्यानंतर स्ट्रॉबेरीचं मिश्रण थापून घ्यावं.
- त्यावर चांदीचा वर्ख लावावा.
- थापलेलं मिश्रण गार करून घ्यावं.
- मिश्रण गार झालं की त्याच्या वड्या कापून घ्याव्या.
कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे. घरोघरी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आता दोन दिवसात बाप्पा आपला निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या बाप्पासाठी गोडा-धोडाचे पदार्थ बनवण्यात येत आहे. घरोघरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या