Christmas 2023 : वाढदिवस असो किंवा एंगेजमेंट, अॅनिव्हर्सरी असो किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सेलिब्रेशन (Celebration) प्रत्येक आनंदाचा क्षण केकशिवाय अपूर्णच आहे. प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळ्या डिझाईन्स आणि चवींचे केक (Cake) बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यातच आता ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेशन (Happy New Year) असल्यामुळे बाजारात केकला विशेष मागणी आहे. बरं हा केक निवडण्यासाठी, तो विशिष्ट प्रकारच्या डिझाईनमध्ये बनवून घेण्यासाठीही फार वेळ लागतो. अशा वेळी हा खास केक सेलिब्रेशननंतर उरला तर फेकून द्यावासा वाटत नाही. पण तो साठवून तरी कसा ठेवायचा? असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी, उरलेला केक कसा साठवून ठेवायचा याच संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. 


केकचा प्रकार जाणून घेणं गरजेचं  




केक साठवण्यापूर्वी त्यात समाविष्ट असलेल्या घटकांची संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे की बटर क्रीम फ्रॉस्टिंगचा चॉकलेट केक रूम टेम्प्रेचरवर राहू शकतो. पण, फ्रूट क्रीम केक फ्रिजमध्ये साठवणं आवश्यक आहे. चीज केक देखील फ्रिजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. 


'या' गोष्टी केकमधून काढून टाका




 


केक स्टोर करण्यापूर्वी त्यावर डिझाईनसाठी ठेवलेली नाशवंत फळे, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी गोष्टी काढून टाका. केक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी क्रीम लेयर काढून टाकणं देखील महत्त्वाचं आहे.


रूम टेंम्प्रेचरवर केक ठेवा




फक्त कापलेल्या केकवर झाकण ठेवून रात्रभर ठेवल्यास तो सकाळपर्यंत पूर्णपणे ताजा राहू शकतो. तसेच, हे आपल्या रूम टेम्प्रेचरवरदेखील अवलंबून असते. पण, थंडीच्या वातावरणात ही समस्या जाणवत नाही.


'अशा' पद्धतीने केक स्टोअर करा 




जर केक मोठा असेल आणि तुम्हाला तो जास्त काळ ताजा ठेवायचा असेल तर आधी त्याचे तुकडे करा. नंतर प्रत्येक केकची स्लाईस अॅल्युमिनियम फॉईल किंवा प्लास्टिकमध्ये गुंडाळा आणि रूम टेम्प्रेचरवर हवेशीर कंटेनरमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमचा केक साधारण 7 दिवस ताजा राहील.


महिनाभर केक टिकेल 




जर तुमच्याकडे जास्त मोठा केक असेल आणि तो तुम्हाला लगेच संपवायचा नसेल तर तुम्ही तो स्टोअर करू शकता. पूर्ण केक न कापता फ्रीजरमध्ये ठेवल्यास तीन महिने सहज ताजे ठेवता येईल. पण केक फ्रीजरमध्ये ठेवण्यापूर्वी तो झाकून ठेवा.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Christmas 2023 Gift Ideas : ऑफिसमध्ये कोणाचा सिक्रेट सांता व्हायचंय? तर, तुमच्या मित्रांना द्या 'या' खास भेटवस्तू